खरेदीसाठी गर्दी...

By Admin | Updated: September 16, 2015 00:16 IST2015-09-16T00:09:35+5:302015-09-16T00:16:42+5:30

तयारी उत्सवाची : सांगलीत खरेदीला उत्साह

Shopping for the crowd ... | खरेदीसाठी गर्दी...

खरेदीसाठी गर्दी...

सांगली : गणरायाच्या आगमनाला आता काही तासांचाच अवधी राहिला असल्याने घरोघरी उत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. सांगलीच्या बाजारपेठेत पूजा साहित्याची गर्दी झाली असून भाविकांमधूनही खरेदीचा उत्साह वाढला आहे. मंगळवारी भाविकांनी हरतालिकेच्या पूजा साहित्याची खरेदी करण्यासाठी मारुती रोडवर गर्दी केली होती.
सार्वजनिक मंडळांबरोबरच घरगुती गणेशोत्सवाची तयारी आता जवळजवळ पूर्ण होत आली आहे. घरच्या गणपतीच्या आराशीच्या तयारीबरोबरच पूजेचे सर्व साहित्य गणरायाच्या आगमनापूर्वीच खरेदी करण्यात येत आहे. सांगलीच्या मारुती रोडवर पूजेच्या सर्व प्रकारच्या साहित्य विक्रीचे स्टॉल सजले आहेत. विक्रेत्यांनीही गर्दी केली आहे. विक्रेत्यांबरोबरच खरेदीदारांचाही उत्साह वाढला आहे. हरतालिकेच्या आगमनाचीही तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी मंगळवारी दिवसभर बाजारात गर्दी होती. (प्रतिनिधी)

Web Title: Shopping for the crowd ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.