शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
5
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
6
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
7
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
8
संपादकीय: चोंडीचा ‘राजकीय’ घाट
9
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
10
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
11
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
12
Operation Sindoor: "माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
13
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
14
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
15
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
16
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
17
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
18
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
19
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
20
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना

सांगलीतील शोभायात्रेने रंगला शारदोत्सव, पुरोहित कन्या शाळेत पाच दिवस चालणारा उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 12:51 IST

शुभ्र कुर्ता-पायजमा, कमरेला भगवा शेला, डोईवर भगवा फेटा आणि उत्साहाच्या अमाप लाटा मनी घेऊन सांगलीच्या पुरोहित कन्या शाळेच्या विद्यार्थीनींनी बुधवारी काढलेल्या शोभायात्रेने शारदोत्सवाचा प्रारंभ झाला. शाळेत देवीची प्रतिष्ठापना करून सुरू झालेल्या या शारदोत्सवाचा समारोप रविवारी महाहादग्याच्या कार्यक्रमाने होणार आहे.

ठळक मुद्देसांगलीतील शोभायात्रेने रंगला शारदोत्सवपुरोहित कन्या शाळेचे आयोजन : पाच दिवस चालणारा उत्सव

सांगली : शुभ्र कुर्ता-पायजमा, कमरेला भगवा शेला, डोईवर भगवा फेटा आणि उत्साहाच्या अमाप लाटा मनी घेऊन सांगलीच्या पुरोहित कन्या शाळेच्या विद्यार्थीनींनी बुधवारी काढलेल्या शोभायात्रेने शारदोत्सवाचा प्रारंभ झाला. शाळेत देवीची प्रतिष्ठापना करून सुरू झालेल्या या शारदोत्सवाचा समारोप रविवारी महाहादग्याच्या कार्यक्रमाने होणार आहे.सांगलीच्या केंगणेश्वरी मंदिरापासून सकाळी थाटात शोभायात्रा निघाली. पाचशेहून अधिक विद्यार्थीनींचा सहभाग असलेल्या या शोभायात्रेत झांजपथक, लेझिम पथक, ध्वजपथक, फलकपथक अशा विविध पथकांचा समावेश होता. यामध्ये देवीची पालखीही सहभागी होती.

मंदिरापासून सुरू झालेली ही यात्रा हरभट रोड, महापालिका, राजवाडा चौक या मार्गे महाविद्यालयात आली. याठिकाणी पारंपारिक पद्धतीने व उत्साहात शोभायात्रेचे व देवीच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. सांगली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीन खाडिलकर यांनी सप्तनिक पुजा केली. यावेळी शाला समितीचे अध्यक्ष अरविंद मराठेही उपस्थित होते.शारदादेवीची प्रतिष्ठापना संस्थेचे संचालक विपिन कुलकर्णी यांच्याहस्ते करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक श्रद्धा केतकर, उपमुख्याध्यापक भारत घाडगे, पर्यवेक्षक श्रीकांत नांदगावकर, सांस्कृतिक विभागप्रमुख उमा संभस, नियंत्रक दयानंद बेंद्रे व रघुवीर रामदासी तसेच सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.शारदोत्सवाची परंपरा २0११ पासून सुरू झाली. पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात शोभायात्रा, गायन स्पर्धा, महाहादगा यांचा समावेश असतो. पाचव्या दिवशी होणाऱ्या महाहादग्याच्या कार्यक्रमाने उत्सवाची सांगता करण्यात येते. माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या सुमारे अडिच ते तीन हजार विद्यार्थीनी या महाहादग्यात सहभागी होत असतात. त्यामुळे हा शहरातील सर्वात मोठा हादगा म्हणून प्रसिद्ध आहे.

सामाजिक प्रबोधनसध्या शासनाने सुरू केलेल्या गोवर व रुबेला लसीबद्दलच्या मोहिमेचा समावेश पुरोहित कन्या शाळेने आपल्या शोभायात्रेत केला. या लसींबाबतची माहिती व प्रसाराचे कार्य म्हणून फलकांवर याबाबतचे घोषवाक्य व माहिती देण्यात आली होती.लक्षवेधी यात्रासांगलीच्या प्रमुख मार्गांवरून शोभायात्रा निघाल्यानंतर त्यातील वाद्यांचा ताल, पारंपरिक लेझिमचा ठेका यामुळे ही यात्रा लक्षवेधी ठरली. यात्रेच्या मार्गावर दुतर्फा लोकांनी यात्रेचा आनंद लुटण्यासाठी गर्दी केली होती. 

टॅग्स :Navratriनवरात्रीSangliसांगली