शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! प्रेमप्रकरणातून कॉलेज तरुणीचा खून; ओळखपत्रावरून संशयित युवक ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 23:08 IST

जत पोलिसांनी संशयित निखिल नामदेव कांबळे (१९, रा. शिवाजी पेठ, जत) याला ताब्यात घेतले आहे.

हणमंत पाटील/सांगली  : जत येथे प्रेमप्रकरणातून महाविद्यालयात शिकत असणाऱ्या अक्षता सदाशिव कोरे (वय २१, रा. सैनिकनगर, जत) या युवतीचा गळा आवळून खून करण्यात आला. ही घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. महाविद्यालयाच्या पुढील बाजूस असणाऱ्या राजवाड्याच्या पडीक जागेत अक्षताचा मृतदेह आढळला. याप्रकरणी जत पोलिसांनी संशयित निखिल नामदेव कांबळे (१९, रा. शिवाजी पेठ, जत) याला ताब्यात घेतले आहे. खुनाच्या नेमक्या कारणाचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जत येथील राजे रामराव महाविद्यालयात बीए भाग एकमध्ये अक्षता शिकत होती. तिचे वडील कापड व्यापारी आहेत. सोमवारी सकाळी सात वाजता वडील तिला महाविद्यालयात सोडून गेले. साडेअकरा वाजता महाविद्यालय सुटते. मात्र, दुपारी तीन वाजले तरी अक्षता घरी आली नाही म्हणून नातेवाइकांनी तिचा शोध सुरू केला होता.

दरम्यान, महाविद्यालयाच्या पुढील बाजूस असणाऱ्या राजवाड्याच्या पडक्या इमारतीत काही गुराख्यांना मुलीचा मृतदेह आढळला. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला गती दिली. खुनाची घटना दुपारी बारा ते दीड वाजण्याच्या सुमारास घडली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. अक्षताचा गळा दाबून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.

याप्रकरणी जत पोलिसांनी संशयित निखिल नामदेव कांबळे (१९, रा. शिवाजी पेठ, जत) याला ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात आले. रात्री उशिरापर्यंत त्याची कसून चौकशी सुरू होती. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पंचनाम्यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. प्राथमिक तपासात प्रेमप्रकरणातून अक्षताचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. मृत अक्षताचा भाऊ सागर सदाशिव कोरे यांनी फिर्याद दिली आहे. 

रितू खोकर यांची भेटखुनाचा प्रकार उघडकीस येताच जत पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. तसेच श्वान पथक, ठसे तज्ज्ञ व फॉरेन्सिक लॅबचे कर्मचारीदेखील दाखल झाले. अप्पर पोलिस अधीक्षक रितू खोकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या. घटनास्थळी मिळालेल्या ओळखपत्राच्या आधारे संशयित निखिल कांबळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. आठवड्यातील दुसरी घटना

खुनाची ही आठवड्यातील दुसरी घटना आहे. गेल्या आठवड्यात बुधवारी भरदिवसा गजबजलेल्या सोलनकर चौकात खून झाला होता. त्यानंतर हा दुसरा खून निर्जन अशा वाड्यात झाला आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी