अहिल्यादेवी जयंतीनिमित्त शोभायात्रा
By Admin | Updated: May 30, 2016 00:51 IST2016-05-29T23:09:20+5:302016-05-30T00:51:10+5:30
विविध कार्यक्रमांचे आयोजन : मान्यवरांकडून अभिवादन; पारंपरिक धनगरी ढोलवादनाने मिरवणुकीत रंगत

अहिल्यादेवी जयंतीनिमित्त शोभायात्रा
सांगली : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त रविवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर शहरातील विविध भागात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तरूणांचा उत्साह आणि पारंपरिक धनगरी वाद्यांच्या गजरात काढण्यात आलेली शोभायात्रा लक्षवेधी ठरली. शहरातील विविध मार्गावरून ही शोभायात्रा काढण्यात आली. चौका-चौकात शोभायात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले.
अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त रविवारी स्टेशन चौक येथे सकाळपासून विविध कार्यक्रम पार पडले. यात सकाळी आ. सुधीर गाडगीळ यांच्याहस्ते पुतळ््यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नगरसेविका संगीता खोत, माजी नगरसेवक सुभाष गोयकर, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गजानन आलदर, संजय यमगर, विनायक रूपनूर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. सायंकाळी शहरातील विविध मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली. स्टेशन चौक येथून शोभायात्रेस प्रारंभ झाला. धनगरी पारंपरिक वाद्यांच्या गजरामुळे यात्रा लक्षवेधी ठरली. फटाक्यांची आतषबाजी आणि पारंपरिक ढोलवादनाबरोबरच लेसर, डॉल्बीच्या साथीने शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत मध्यभागी चांदीच्या रथामध्ये अहिल्यादेवी यांचा पुतळा होता. या सर्व कार्यक्रमास शहरासह परिसरातील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
कार्यक्रमांचे संयोजन समितीचे अध्यक्ष गजानन आलदर, उपाध्यक्ष संजय यमगर, माजी नगरसेवक सुभाष गोयकर, विनायक रूपनर, धनंजय रूपनर, सुनील वाघमोडे आदींनी केले. सोमवारी व मंगळवारीही कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. (प्रतिनिधी)
चार वाजता प्रा. अरूण घोडके यांचे व्याख्यान झाले. यावेळी घोडके यांनी अहिल्यादेवी यांनी समाजसुधारणेसाठी केलेल्या कार्याचा आलेख मांडत, सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आजही त्यांचे विचार प्रेरणादायी ठरणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी बापू बिरू वाटेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.