शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: तासगावात दोन गटांतील वादातून शिवनेरी मंडळाच्या अध्यक्षाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 11:31 IST

दोन दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून दोन गटात वादावादी झाली

तासगाव : तासगाव शहरात ढवळवेस येथे जुन्या भांडणाच्या वादातून शिवनेरी मंडळाचे अध्यक्ष अनिल बाबासाहेब जाधव (वय ५०) यांचा धारदार शस्त्राने हल्ला करून खून करण्यात आला. काल, गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत तासगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.तासगाव शहरात ढवळवेस येथे दोन दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून दोन गटात वादावादी झाली होती. याच वादातून गुरुवारी दुपारी पुन्हा या दोन गटांतील कार्यकर्त्यांत वादावादी झाली होती. दुपारच्या सुमारास कोकणे कॉर्नरजवळ दोन गटांतील तरुणांत किरकोळ हाणामारी झाली होती. त्यानंतर पुन्हा या दोन गटांतील वाद उफाळला होता.सायंकाळपर्यंत दोन्ही गटांकडून एकमेकांवर हल्ल्याची तयारी होती. मात्र सायंकाळी सातच्या सुमारास पाऊस पडू लागल्यानंतर गर्दी पागंली. अनिल जाधव यांच्यासोबत असणारे कार्यकर्ते निघून गेले होते. त्यानंतर काही वेळातच सुमारे पन्नासहून अधिक तरुणांच्या जमावाने ढवळवेसमध्ये प्रवेश करून हल्ला केला. हल्लेखोरांनी अनिल जाधव यांच्यावर घरापासून काही अंतरावर धारदार शस्त्राने जोरदार हल्ला केला. हल्ला करून हल्लेखोर लगेचच पसार झाले. हल्ल्यानंतर जाधव रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. नातेवाईक आणि जवळच्या लोकांनी त्यांना तातडीने शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.खूनाच्या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी भेट दिली. दखाखान्याबाहेरदेखील जाधव यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. शहरात तणावपूर्ण वातावरण असल्याने पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी