कृष्णा व्हॅली क्लबच्या अध्यक्षपदी शिवकुमार जुमराणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:27 IST2021-04-04T04:27:56+5:302021-04-04T04:27:56+5:30

कुपवाड : कुपवाड एमआयडीसीतील कृष्णा व्हॅली क्लबच्या अध्यक्षपदी शिवकुमार जुमराणी यांची, तर उपाध्यक्षपदी रवींद्र मिरजकर आणि सचिवपदी राहुल ...

Shivkumar Jumrani as the President of Krishna Valley Club | कृष्णा व्हॅली क्लबच्या अध्यक्षपदी शिवकुमार जुमराणी

कृष्णा व्हॅली क्लबच्या अध्यक्षपदी शिवकुमार जुमराणी

कुपवाड : कुपवाड एमआयडीसीतील कृष्णा व्हॅली क्लबच्या अध्यक्षपदी शिवकुमार जुमराणी यांची, तर उपाध्यक्षपदी रवींद्र मिरजकर आणि सचिवपदी राहुल देशपांडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

कृष्णा व्हॅली क्लबची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. माजी अध्यक्ष अशोक कोठावळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. यावेळी निवडी पार पडल्या.

कोठावळे म्हणाले की, देशात १२० क्लबची कृष्णा व्हॅली क्लबशी जोडणी आहे. सभासदांनी क्लबच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा.

नूतन अध्यक्ष जुमराणी म्हणाले की, सभासदांच्या गरजा लक्षात घेऊन क्लबचे नूतनीकरण केले आहे.

राजेंद्र देवल यांनी आभार मानले. कार्यक्रमास बन्सीलाल ओस्तवाल, एन. जी. कामत, यशोधन फडके, अजय पोतदार, राजेंद्र देवल, वसंतकुमार, धर्मेंद्र खिलारे, महेशकुमार झंवर आदी उपस्थित होते.

फोटो ओळ : कुपवाड : येथील कृष्णा व्हॅली क्लबच्या नूतन पदाधिकारी यांचा गौरव करताना अशोक कोठावळे, एन. जी. कामत आदी.

Web Title: Shivkumar Jumrani as the President of Krishna Valley Club

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.