शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

सांगलीत अखंड तेवणारी शिवज्योत प्रज्ज्वलित, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर प्रतिष्ठापना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 13:55 IST

शिवपुतळ्यासमोरील शिवज्योत १२ महिने २४ तास तेवत राहणार आहे. त्यासाठी पुतळ्यासमोर विशेष बांधकाम

सांगली : सांगलीत सोमवारी नेत्रदीपक सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर अखंड शिवज्योत प्रज्ज्वलित करण्यात आली. शिवराज्याभिषेक दिनाचा मुहूर्त साधून पृथ्वीराज पाटील फाैंडेशनतर्फे चिरंतन ज्योतीची शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर प्रतिष्ठापना करण्यात आली. ती अखंड तेवत राहणार आहे.सोमवारी रायगडावर ज्योत प्रज्ज्वलित करण्यात आली. सायंकाळी सांगलीत टिळक चौकात जल्लोषी स्वागत केले. पारंपरिक वेशभूषा केलेले मावळे, झांजपथक, घोडेस्वार यांसह मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते व शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होते. फुलांच्या पायघड्यांवरून ज्योतीची मिरवणूक निघाली. मारुती रस्त्यावरून पुतळ्याजवळ आली. यावेळी अखंडपणे आतषबाजी सुरू होती. शिवरायांचा जयघोष सुरू होता.शिवज्योत प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त शिवपुतळ्याला नेत्रदीपक रोषणाई केली होती. प्रकाशझोतामुळे पुतळा उजळून निघाला होता. छत्रपतींच्या जय-जयकारात शिवज्योत प्रज्ज्वलित करण्यात आली. यावेळी शिवप्रेमींनी एकच जल्लोष केला. सोहळा डोळ्यांत साठविण्यासाठी सांगलीकरांनी एकच गर्दी केली होती. वीरेंद्र पाटील यांच्या संकल्पनेतून शिवज्योतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. संयोजन पृथ्वीराज पाटील व सहकाऱ्यांनी केले.

१२ महिने २४ तास शिवज्योत तेवणार

शिवपुतळ्यासमोरील शिवज्योत १२ महिने २४ तास तेवत राहणार आहे. त्यासाठी पुतळ्यासमोर विशेष बांधकाम केले आहे. ज्योतीसाठी गॅसचा वापर केला असून आठवड्याला सुमारे दोन सिलिंडर लागतील. अखंड शिवज्योतीची ही संकल्पना एकमेव असल्याचा दावा पृथ्वीराज पाटील यांनी केला. शिवज्योतीद्वारे तरुणांना स्फूर्ती आणि प्रेरणा मिळेल असेही ते म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज