शिवाजीराव पाटील यांचे कार्य मार्गदर्शक : वैभव शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:09 IST2020-12-05T05:09:25+5:302020-12-05T05:09:25+5:30

आष्टा : शिवाजीराव पाटील (आप्पा) यांनी माजी आमदार विलासराव शिंदे यांना दैवत मानून शहराच्या विकासाला चालना दिली. त्यांचे कार्य ...

Shivajirao Patil's work guide: Vaibhav Shinde | शिवाजीराव पाटील यांचे कार्य मार्गदर्शक : वैभव शिंदे

शिवाजीराव पाटील यांचे कार्य मार्गदर्शक : वैभव शिंदे

आष्टा : शिवाजीराव पाटील (आप्पा) यांनी माजी आमदार विलासराव शिंदे यांना दैवत मानून शहराच्या विकासाला चालना दिली. त्यांचे कार्य युवा पिढीला मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन आष्टा शहर विकास आघाडीचे नेते वैभव शिंदे यांनी केले.

शिवाजीराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवाजीराव पाटील आप्पा नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने आयोजित कार्यक्रमप्रसंगी वैभव शिंदे बोलत होते. यावेळी शिवाजीराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन वैभव शिंदे, प्राचार्य विशाल शिंदे, माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील, राजू पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब हालुंडे, केशव माळी, धैर्यशील शिंदे, शेरनवाब देवळे, सचिव सुनील पाटील व सर्व संचालक उपस्थित होते.

पोपट माळी म्हणाले, सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला एका मार्गदर्शकाची गरज आहे. जीवनातील कठीण प्रसंगावेळी आई-वडील, मित्र, भाऊ बहीण यांचा आदर्श डोळ्यासमोर असावा, त्यांचा आपुलकीचा जिव्हाळा सोबत असल्यास प्रत्येक प्रसंगातून सावरण्याचे बळ मिळते. सर्वांनी तो जपावा.

यावेळी जैद देवळे, अनिल कुंभार, सर्जेराव सावंत, विनायक पाटील, सुनील पाटील, दीपक थोटे, दीपक शिंदे, प्रभाकर जाधव, अनिल सिद्ध यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

फोटो : ०४१२२०२०-आयएसएलएम-आष्टा न्यूज

ओळ : आष्टा येथे शिवाजीराव पाटील (आप्पा) यांना अभिवादन करताना वैभव शिंदे, विशाल शिंदे, झुंजारराव पाटील, राजू पाटील, धैर्यशील शिंदे, अण्णासाहेब हालुंडे, सुनील पाटील, केशव माळी.

Web Title: Shivajirao Patil's work guide: Vaibhav Shinde