शिवाजीराव पाटील पतसंस्थेचे १२ कोटींचे उद्दिष्ट पूर्ण : पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:25 IST2021-03-14T04:25:16+5:302021-03-14T04:25:16+5:30

आष्टा : आष्टा सहकार पंढरीत शिवाजीराव पाटील आप्पा नागरी सहकारी पतसंस्थेने सभासदांचा विश्वास प्राप्त करीत १२ कोटी ठेवींचे उद्दिष्ट ...

Shivajirao Patil Patsanstha's target of 12 crores achieved: Patil | शिवाजीराव पाटील पतसंस्थेचे १२ कोटींचे उद्दिष्ट पूर्ण : पाटील

शिवाजीराव पाटील पतसंस्थेचे १२ कोटींचे उद्दिष्ट पूर्ण : पाटील

आष्टा : आष्टा सहकार पंढरीत शिवाजीराव पाटील आप्पा नागरी सहकारी पतसंस्थेने सभासदांचा विश्वास प्राप्त करीत १२ कोटी ठेवींचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. कोरोना संकट काळातही सभासदांना लाभांश वाटप करत संस्थेने लौकिक जपला आहे, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष व संस्थेचे संस्थापक झुंजारराव पाटील यांनी केले.

आष्टा येथील शिवाजीराव पाटील आप्पा नागरी सहकारी पतसंस्थेच्या १५ व्या वार्षिक सभेत झुंजारराव पाटील बोलत होते. डॉ. संजीव माने अध्यक्षस्थानी होते. डॉ. संजीव माने, सुहास रुगे, इम्तियाज मुन्शी, नासिर मुजावर, प्रदीप ढोले यांचा यावेळी सत्कार केला.

मॅनेजर सुनील पाटील यांनी अहवाल वाचन केले. अध्यक्ष अण्णासाहेब हालुंडे, उपाध्यक्ष केशव नागू माळी, संचालक राजू पाटील, दीपक शिंदे, मारुतीराव सावंत, गौतम धनवडे, जैद देवळे, सर्व संचालक मंडळ, सल्लागार मंडळ, सभासद, हितचिंतक व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Shivajirao Patil Patsanstha's target of 12 crores achieved: Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.