शिवाजीराव पाटील वाचनालयाने अधिकारी घडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:24 IST2021-02-12T04:24:05+5:302021-02-12T04:24:05+5:30
आष्टा : शिवाजीराव पाटील (आप्पा) सार्वजनिक वाचनालयाने सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले आहे. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून ...

शिवाजीराव पाटील वाचनालयाने अधिकारी घडविले
आष्टा : शिवाजीराव पाटील (आप्पा) सार्वजनिक वाचनालयाने सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले आहे. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून अधिकारी घडविण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य झुंजारराव पाटील यांनी केले.
आष्टा तालुका वाळवा येथील शिवाजीराव पाटील (आप्पा) सार्वजनिक वाचनालयाच्या वार्षिक सभेत ते बोलत होते. अण्णासाहेब हालुंडे, राजू पाटील, केशव माळी, सुनील पाटील, मिलिंद गोखले, प्रदीप ढोले, पोपट माळी, अंकुश मदने, बाबासाहेब सिद्ध, अविनाश विरभद्रे, महेंद्र वीरभक्त उपस्थित होते. उपनगराध्यक्षा प्रतिभा पेटारे, संचालक साजिद इनामदार यांचा सत्कार करण्यात आला. सुनील पाटील यांनी स्वागत केले. गौतम धनवडे यांनी आभार मानले.
फोटो : ११०२२०२१-आयएसएलएम-आष्टा वाचनालय न्यूज
आष्टा (ता. वाळवा) येथे शिवाजीराव पाटील वाचनालयाच्यावतीने नूतन उपनगराध्यक्षा प्रतिभा पेटारे यांचा सत्कार झुंजारराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अण्णासाहेब हालुंडे, केशव माळी ,राजू पाटील ,सुनील पाटील, गौतम धनवडे, प्रदीप ढोले ,महेंद्र वीरभक्त उपस्थित होते.