शिवाजीराव नाईक यांची पूरग्रस्त भागास भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:28 IST2021-07-27T04:28:04+5:302021-07-27T04:28:04+5:30
कोकरुड : वारणा व मोरणा नदीला आलेला पूर ओसरताच प्रशासनाने तत्काळ वस्तुनिष्ठ पंचनामे करून पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत ...

शिवाजीराव नाईक यांची पूरग्रस्त भागास भेट
कोकरुड : वारणा व मोरणा नदीला आलेला पूर ओसरताच प्रशासनाने तत्काळ वस्तुनिष्ठ पंचनामे करून पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे, असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी केले.
आराळा (ता. शिराळा) येथील प्रमुख बाजारपेठेमध्ये आलेल्या पुराच्या पाण्याची नाईक यांनी पाहणी केली. या वेळी ते बोलत होते. नाईक म्हणाले, मागील तीन दिवसांमध्ये वारणा व मोरणा नदीला आलेल्या पुरामुळे शिराळा व वाळवा तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पाण्याखाली गेलेली व पाण्याच्या बाहेरील शेतजमीन पूर्णपणे खचून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आरळा, देववाडी, मांगले, सागाव या गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने तेथील नागरिकांना स्थलांतरित करावे लागले. ज्या लोकांचे स्थलांतर करण्यात आले त्यांना तत्काळ शासनाने मदत द्यावी. कोरोनापाठोपाठ आलेल्या महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने पूरस्थितीची फक्त पहाणी न करता थेट वस्तुनिष्ठ पंचनामे करून सरसकट नागरिकांना मदत करावी.
या वेळी अशोक बेर्डे, कृष्णा बेर्डे, बाबूराव गावडे, पोपट खोत, सरपंच सखाराम दुर्गे, संचालक प्रकाश जाधव, माजी उपसभापती एन.डी. लोहार, कैलास पाटील, हिंदुराव नांगरे, संचालक मोहन पाटील, तालुका युवा मोर्चा सरचिटणीस विकास शिरसट आदी उपस्थित होते.
फोटो : २६ काेकरुड ५
ओळ : मुसळधार पावसामुळे वारणा नदीला आलेल्या पुरामुळे पश्चिम भागातील झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी राज्याचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी केली.