कोकरूडला उद्यापासून शिवाजीराव देशमुख व्याख्यानमाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:09 IST2021-01-13T05:09:37+5:302021-01-13T05:09:37+5:30

कोकरूड : कोकरूड (ता. शिराळा) येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने गुरुवार, दि.१४ पासून तीनदिवसीय शिवाजीराव देशमुख व्याख्यानमाला आयोजित केल्याची ...

Shivajirao Deshmukh lectures to Kokrud from tomorrow | कोकरूडला उद्यापासून शिवाजीराव देशमुख व्याख्यानमाला

कोकरूडला उद्यापासून शिवाजीराव देशमुख व्याख्यानमाला

कोकरूड : कोकरूड (ता. शिराळा) येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने गुरुवार, दि.१४ पासून तीनदिवसीय शिवाजीराव देशमुख व्याख्यानमाला आयोजित केल्याची माहिती सरपंच विलास वाघमारे व उपसरपंच पोपट पाटील यांनी दिली.

व्याख्यानमालेचे हे चौथे वर्ष आहे. दि.१४ ते १६ जानेवारी हे तीन दिवस मुख्य बाजारपेठेत निनाईदेवी मंदिर चौकात सायंकाळी ६ वाजता व्याख्यानास प्रारंभ होणार आहे. प्रथम पुष्प गुरुवार, दि.१४ रोजी गुंफले जाणार असून, पाटोद्याचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांचे ‘आदर्श गाव घडवताना’ या विषयावर व्याख्यान होणार असून, अध्यक्षस्थानी तामिळनाडू सरकारचे सचिव आनंद पाटील आहेत.

दि.१५ रोजी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांचे ‘आई समजून घेताना’ या विषयावर व्याख्यान होणार असून, अध्यक्षस्थानी युवा नेते सत्यजित देशमुख असतील. दि.१६ रोजी तिसरे व अखेरचे पुष्प गुंफले जाणार असून, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांचे ‘जीवनात विनोदाचे स्थान’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

Web Title: Shivajirao Deshmukh lectures to Kokrud from tomorrow