मल्लिकार्जुन डोंगरावर उद्या शिव-पार्वती विवाह सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:11 IST2021-01-13T05:11:04+5:302021-01-13T05:11:04+5:30

कामेरी : श्री क्षेत्र मल्लिकार्जुन डोंगरावर १४ जानेवारीस मकर संक्रांतीस रात्री बारा वाजता शिव-पार्वती विवाह सोहळा होणार आहे, अशी ...

Shiva-Parvati wedding ceremony on Mallikarjun hill tomorrow | मल्लिकार्जुन डोंगरावर उद्या शिव-पार्वती विवाह सोहळा

मल्लिकार्जुन डोंगरावर उद्या शिव-पार्वती विवाह सोहळा

कामेरी : श्री क्षेत्र मल्लिकार्जुन डोंगरावर १४ जानेवारीस मकर संक्रांतीस रात्री बारा वाजता शिव-पार्वती विवाह सोहळा होणार आहे, अशी माहिती मल्लिकार्जुन सेवाभावी मंडळाचे अध्यक्ष गोरक्षनाथ गुरव यांनी दिली.

यावेळी रंगावलीकार किरण शिंदे (बागणी) यांच्याकडून आकर्षक रांगोळी काढण्यात येणार आहे, तर दिवसभर मंदिर परिसरात साफसफाई, स्वच्छता करण्यात येणार आहे. हनमंत गुरव यांच्याकडून लग्न मंडप व मंदिराला मोफत रोषणाई करण्यात येणार असून दिलीप पाटील, कुमार गुंडा पाटील सर्व मंदिर परिसराला रंगकाम करून देणार आहेत. सायंकाळी येडेनिपाणी येथील तात्याबुवा भजनी मंडळाचा भजनाचा व रात्री बिरोबा मंडळ व संत बाळूमामा ओवीकार मंडळ यांचा ओव्यांचा कार्यक्रम होईल. रात्री ११ वाजता पालखी व सुरगीचा कार्यक्रम, तर १२ वाजता शिव-पार्वती विवाह सोहळा व आलेल्या सर्व शिवभक्तांना लाडू-चिवडा वाटप केले जाणार आहे.

Web Title: Shiva-Parvati wedding ceremony on Mallikarjun hill tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.