मम्मा प्री स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:20 IST2021-02-20T05:20:23+5:302021-02-20T05:20:23+5:30

नेर्ले : ज्ञानदान शिक्षण संस्थेच्या ‘मम्मा प्री स्कूल’मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी झाली. या कार्यक्रमास ...

Shiva Jayanti excitement at Mamma Pre School | मम्मा प्री स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात

मम्मा प्री स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात

नेर्ले : ज्ञानदान शिक्षण संस्थेच्या ‘मम्मा प्री स्कूल’मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी झाली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष संजय पाटील व संतोष खरमाटे हे होते.

मम्मा प्री स्कूलच्या प्रिन्सीपल दर्शू जगताप यांनी स्वागत तर दिग्विजय पाटील यांनी पाहुण्यांना वृक्ष देऊन त्यांचे स्वागत केले. स्कूलचे सर्व विद्यार्थी हे विविध पोशाखात आले होते व त्यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी भाषण केले.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून नेर्ले परिसरातील लोकांना शिवाजी महाराज, जिजाऊ आणि तानाजी मालुसरे, अशा विविध पोशाखांतील महापुरुषांचे दर्शन झाले स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या पालकांचा या कार्यक्रमास मोठा प्रतिसाद होता. स्कूलच्या प्रिन्सीपल यांनी पालकांच्या विविध फनी गेम घेऊन विद्यार्थी व पालकांचे मनोरंजन केले. या कार्यक्रमास दलित महासंघाचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष विकास बल्लाळ यांनी खाऊ वाटप केले. यावेळी संदीप मोहिते, हिरोजी पाटील, अभिजित रणखांबे, यांच्यासह पालक विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाची सर्व तयारी श्रद्धा जाधव, वर्षा वेटम यांनी केली. स्कूलच्या शिक्षिका प्राजक्ता पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Shiva Jayanti excitement at Mamma Pre School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.