उमदी परिसरात शिवजयंती थाटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:48 IST2021-02-21T04:48:43+5:302021-02-21T04:48:43+5:30
बसस्थानक परिसरात मुंबई उपनगरचे उपजिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्याहस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सरपंच वर्षा शिंदे, उपसरपंच कल्लाव्वा ...

उमदी परिसरात शिवजयंती थाटात
बसस्थानक परिसरात मुंबई उपनगरचे उपजिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्याहस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सरपंच वर्षा शिंदे, उपसरपंच कल्लाव्वा तोरणे, निवृत्ती शिंदे, बंडा शेवाळे, अनिल शिंदे, वहाब मुल्ला, चंदू नागणे, रमेश हळके, बाबू सावंत, अक्षय भोसले, तानाजी मोरे, सुरेश पवार आदी उपस्थित होते. महात्मा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज कार्यक्रमास एस. के. होर्तीकर, उपप्राचार्य डी. सी. बासरगांव उपस्थित होते. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच वर्षा शिंदे, उपसरपंच कल्लाव्वा तोरणे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. नारायण ऐवळे, भीमू कोरे, सिद्धू पुजारी, नामदेव सातपुते, महावीर आजमाने, पिंटू कोकळे उपस्थित होते. उमदी पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांनी प्रतिमा पूजन केले. यावेळी सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.