घाटमाथ्यावर शिवजयंती उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:17 IST2021-02-20T05:17:51+5:302021-02-20T05:17:51+5:30

घाटनांद्रे : कवठेमहाकाळ तालुक्याच्या घाटमाथ्यावरील घाटनांद्रे, तिसंगी, वाघोली, गर्जेवाडी, कुंडलापूर,जाखापूर व कुची परिसरात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने ...

Shiva Jayanti celebrated on Ghatmathya with enthusiasm | घाटमाथ्यावर शिवजयंती उत्साहात साजरी

घाटमाथ्यावर शिवजयंती उत्साहात साजरी

घाटनांद्रे : कवठेमहाकाळ तालुक्याच्या घाटमाथ्यावरील घाटनांद्रे, तिसंगी, वाघोली, गर्जेवाडी, कुंडलापूर,जाखापूर व कुची परिसरात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.

कुची, घाटनांद्रेमध्ये पन्हाळगडावरून तर तिसंगी, कुंडलापूर येथे बानूरगडावरून शिवज्योत आणण्यात आली. शिवजयंतीनिमित्ताने काही ठिकाणी रेकाॅर्ड डान्स, संगीतखुर्ची, क्रिकेट स्पर्धेचेही आयोजन केले होते.

घाटनांद्रे येथील मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर लोकवर्गणीतून सुशोभिकरण करुन ‘शिवतीर्थ घाटनांद्रे’ असे नामकरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे संयोजन वैभव शिंदे, नेताजी शिंदे, विजय शिंदे, सागर कदम, पांडुरंग शिंदे, संकेत शिंदे, आशिष शिंदे, सौरभ गुरव, योगेश गुरव, शुभम शिंदे यांनी केले होते.

Web Title: Shiva Jayanti celebrated on Ghatmathya with enthusiasm