ऐतवडे बुद्रुक, चिकुर्डे, कार्वेसह परिसरात शिवजयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:20 IST2021-02-20T05:20:18+5:302021-02-20T05:20:18+5:30
ऐतवडे बुद्रुक : ऐतवडे बुद्रुक, चिकुर्डे, कार्वे, डोंगरवाडी, ठाणापुढे येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. चिकुर्डे येथे माजी जिल्हा परिषद ...

ऐतवडे बुद्रुक, चिकुर्डे, कार्वेसह परिसरात शिवजयंती उत्साहात
ऐतवडे बुद्रुक : ऐतवडे बुद्रुक, चिकुर्डे, कार्वे, डोंगरवाडी, ठाणापुढे येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. चिकुर्डे येथे माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी सरपंच कमल पांढरे, उपसरपंच उत्तम पाटील, ग्रामविकास अधिकारी मोहन पाटील, अमृतकुमार पांढरे, सुधीर कांबळे आदी उपस्थित होते. ऐतवडे बुद्रुक येथे ग्रामपंचायत व ढगेवाडी फाटा येथे शिवजयंती करण्यात आली. यावेळी सरपंच प्रतिभा बुद्रुक, उपसरपंच अशोक दिंडे, प्रशांत कुंभार, अतुल गुरव आदी उपस्थित होते. डोंगरवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी उपसरपंच एकनाथ नांगरे, माजी उपसरपंच प्रताप ठोंबरे, हनुमान दूध संस्थेचे अध्यक्ष दशरथ लबडे आदी उपस्थित होते.