शिवसेनेची सांगली-तुळजापूर मंगलकलश यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:20 IST2020-12-27T04:20:15+5:302020-12-27T04:20:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सांगली : शिवसेनेच्या सांगली-तुळजापूर मंगलकलश यात्रेचा प्रारंभ राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला. दरवर्षी ...

शिवसेनेची सांगली-तुळजापूर मंगलकलश यात्रा
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली :
सांगली : शिवसेनेच्या सांगली-तुळजापूर मंगलकलश यात्रेचा प्रारंभ राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला. दरवर्षी ही यात्रा सांगलीतून निघते. यंदाही परंपरा अखंडित ठेवत यात्रा काढण्यात आली.
शिवसेनेचे माजी उपशहरप्रमुख हरिदास पडळकर हे तुळजाभवानी मातेला जलाभिषेक करून आशीर्वाद मागण्यासाठी गेली पंधरा वर्षे मोटारसायकलने यात्रा करतात. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सत्ता असल्याने आता सेनेचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या समारंभाला, तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सेनेच्या कार्यक्रमाला हजेरी लावताना दिसत आहेत. शनिवारी सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ या यात्रेचा प्रारंभ राष्ट्रवादीचे अध्यक्ष संजय बजाज यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे राहुल पवार, माजी नगरसेवक हरीदास पाटील, शिवप्रतिष्ठानचे नितीन चौगुले, शहरप्रमुख महेंद्र चंडाळे, अमोल पाटील, रवींद्र सांवत, सतीश सूर्यवंशी, धुडांप्पा माळी, विजय गडदे, आदी उपस्थित होते.