पलूसमध्ये शिवसेनेतर्फे माेफत आरोग्य शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:32 IST2021-02-17T04:32:57+5:302021-02-17T04:32:57+5:30

प्रकाश हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर, उरुण इस्लामपूर व लोकनेते राजारामबापू पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, इस्लामपूर यांच्या संयुक्त ...

Shiv Sena's health camp in Palus | पलूसमध्ये शिवसेनेतर्फे माेफत आरोग्य शिबिर

पलूसमध्ये शिवसेनेतर्फे माेफत आरोग्य शिबिर

प्रकाश हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर, उरुण इस्लामपूर व लोकनेते राजारामबापू पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, इस्लामपूर यांच्या संयुक्त सहकार्याने शिबिरामध्ये गरीब व गरजू रुग्णांची विविध आजारांची मोफत तपासणी करून औषध उपचार करण्यात आले. या शिबिरात दाखल रुग्णांच्या पुढील उपचारावर शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष लक्ष ठेवून आहे.

कार्यक्रमास शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पश्चिम महाराष्ट्र समन्वयक डॉ. किशोर ठाणेकर यांनी भेट दिली.

या कार्यक्रमास युवासेना तासगावप्रमुख नंदू मंडले, कवठेमहांकाळ युवासेना तालुकाप्रमुख प्रमोद खोत. मुख्याध्यापिका संगीता पाटील, वंदना सणगर, आनंदराव सूर्यवंशी, दिलीप शेखर आदी उपस्थित होते.

फोटो : १६ सावंतपुर १

ओळ : पलूस येथे शिवसेनेतर्फे आयाेजित मोफत आरोग्य शिबिराचे उदघाटन नगरसेवक शकील सय्यद, विनायक गोंदिल यांच्याहस्ते करण्यात आले.

Web Title: Shiv Sena's health camp in Palus