आष्ट्यात शिवसेनेचे बुरखा फाडो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:28 IST2021-01-19T04:28:00+5:302021-01-19T04:28:00+5:30
आष्टा : आष्टा पालिकेच्या आरोग्य विभागातील गैरव्यवहाराच्या निषेधार्थ आष्टा शहर शिवसेनेच्या वतीने नगरसेवक वीर कुदळे यांच्या नेतृत्वाखाली 'बुरखा फाडो' ...

आष्ट्यात शिवसेनेचे बुरखा फाडो आंदोलन
आष्टा : आष्टा पालिकेच्या आरोग्य विभागातील गैरव्यवहाराच्या निषेधार्थ आष्टा शहर शिवसेनेच्या वतीने नगरसेवक वीर कुदळे यांच्या नेतृत्वाखाली 'बुरखा फाडो' आंदोलन करण्यात आले. मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.
वीर कुदळे म्हणाले, 'आष्टा पालिकेने मागील चार वर्षांत जंतुनाशक पावडर फवारणी यासह पावडर फवारणी मशीन यावर २० लाख रुपये खर्च करूनसुद्धा शहरात डेंग्यू, चिकुनगुण्या यासह विविध आजार फैलावत आहेत. पालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी आरोग्याबाबत उदासीनता दाखवली आहे.'
यावेळी वर्षा औघडे, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष अमोल पडळकर, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण माने, शिवसेना शहराध्यक्ष राकेश आटूगडे, नंदकिशोर आटुगडे, दिलीप कुरणे, सतीश कुलकर्णी, गणेश माळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो : १८ आष्टा १
ओळ : आष्टा येथे शिवसेनेच्या वतीने वीर कुदळे यांच्या नेतृत्वाखाली बुरखा फाडो आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रवीण माने, अमोल पडळकर, राकेश आटुगडे, नंदकिशोर आटुगडे, वर्षा औघडे उपस्थित हाेते.