माजी सैनिकांच्या न्यायासाठी शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:20 IST2021-02-05T07:20:13+5:302021-02-05T07:20:13+5:30
इस्लामपूर : साखराळे (ता. वाळवा) येथील माजी सैनिकांना दिलेले प्लॉट मागे घेण्याचा आदेश प्रांताधिकाऱ्यांनी रद्द करून त्या माजी सैनिकांना ...

माजी सैनिकांच्या न्यायासाठी शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
इस्लामपूर : साखराळे (ता. वाळवा) येथील माजी सैनिकांना दिलेले प्लॉट मागे घेण्याचा आदेश प्रांताधिकाऱ्यांनी रद्द करून त्या माजी सैनिकांना प्लॉट द्यावेत, अन्यथा शहर शिवसेनेच्यावतीने शुक्रवारी (दि. ५ फेब्रुवारी) पेठ-सांगली रस्त्यावर रास्ता रोको आंदेलन करण्याचा इशारा शहरप्रमुख, नगरसेवक शकील सय्यद यांनी दिला आहे.
सय्यद यांनी याबाबतचे निवेदन प्रांताधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामध्ये साखराळे येथील रहिवासी असणारे माजी सैनिक महेश मानसिंग उतळे, अर्चना सचिन पवार, गणेश बाबूराव बोकारे, सुभाष बजरंग शिंदे यांनी गावठाण सि. स. नं. २९३ मधील प्लॉट मिळण्यासाठी मोजणी फीसह प्रांताधिकाऱ्यांनी ४ सप्टेंबर २०२० रोजी दिलेल्या आदेशावरून २२ लाख ८८ हजाराची कब्जे हक्काची रक्कम शासकीय खजिन्यात ७ सप्टेंबर रोजी जमा केली. माजी सैनिकांनी सर्व कायदेशीर बाबी आणि कागदपत्रांची पूर्तता केलेली असतानाही प्रांताधिकाऱ्यांनी २२ ऑक्टोबर २०२० ला प्लॉट देता येत नसल्याबाबतचे आदेश दिले. त्यामुळे या माजी सैनिकांना उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने प्लॉट देता येत नसल्याबद्दल काढलेले आदेश रद्द करून माजी सैनिकांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.
फोटो -०२०२२०२१-आयएसएलएम-शिवसेना निवेदन न्यूज
इस्लामपूर येथे शिवसेनेच्यावतीने शहरप्रमुख शकील सय्यद यांनी प्रांताधिकारी नागेश पाटील यांना निवेदन दिले.