शिवसेना सर्व निवडणुका स्वबळावर लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:29 IST2021-09-22T04:29:38+5:302021-09-22T04:29:38+5:30

इस्लामपूर येथे शिवसेनेच्या मेळाव्यात तालुकाप्रमुख सागर मलगुंडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शकील सय्यद, वीर कुदळे, प्रदीप लोहार, अंकुश माने ...

Shiv Sena will contest all elections on its own | शिवसेना सर्व निवडणुका स्वबळावर लढणार

शिवसेना सर्व निवडणुका स्वबळावर लढणार

इस्लामपूर येथे शिवसेनेच्या मेळाव्यात तालुकाप्रमुख सागर मलगुंडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शकील सय्यद, वीर कुदळे, प्रदीप लोहार, अंकुश माने उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : शिवसैनिकांनी पक्षाच्या माध्यमातून सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व निवडणुका स्वबळावर लढणार आहोत, असे प्रतिपादन तालुकाप्रमुख सागर मलगुंडे यांनी केले.

येथे वाळवा तालुक्यातील पदाधिकारी आणि शिवसैनिकांचा संवाद मेळावा झाला. यावेळी उपजिल्हा प्रमुख नंदकिशोर निळकंठ, संघटक वीर कुदळे, शहरप्रमुख शकील सय्यद, नगरसेवक प्रदीप लोहार, उमेश पवार, अंकुश माने उपस्थित होते.

सय्यद म्हणाले, शिवसेना या चार अक्षराचे महत्त्व आणि ताकद काय आहे, हे प्रत्येक शिवसैनिकाने दाखवून दिले पाहिजे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या ताकदीची शिदोरी खूप मोठी आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ सामान्यांपर्यंत पोहोचवायला हवा.

संजय गांधी योजनेचे सदस्य राहुल टिबे, वीर कुदळे यांनी मनोगत व्यक्त केले.

मेळाव्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

आनंदराव पवार यांच्या संकल्पनेतून जय महाराष्ट्र ऑनलाईन सेवा केंद्राची स्थापना करण्यात आली. संयोजक प्रथमेश काटे यांनी येथून दिल्या जाणाऱ्या मोफत सेवेची माहिती दिली. यावेळी योगेश हुबाले, संजय चव्हाण, रामचंद्र घारे, परशुराम बामणे, राजेश पाटील, अनंत नाईक, आशपाक जमादार, जी. डी. सूर्यवंशी, सुहास पाटील उपस्थित होते.

Web Title: Shiv Sena will contest all elections on its own

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.