शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli- मिरजेत शिवसेना शिंदे-ठाकरे गट कमानीच्या वादावर अखेर पोलिसांचा तोडगा, पण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 17:58 IST

वादग्रस्त देखाव्यास प्रतिबंध

मिरज : मिरजेतील गणेशोत्सवात उभारण्यात येणाऱ्या स्वागतकमानीवर दावा करणाऱ्या शिंदे व उद्धव ठाकरे गटास दोन वेगवेगळ्या ठिकाणी स्वागतकमानीची परवानगी देऊन पोलिसांनी या प्रकरणावर तोडगा काढला आहे. दोन्ही गटांच्या स्वागतकमानी समोरासमोर होणार आहेत. वादग्रस्त देखाव्यास परवानगी मिळणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केल्यानंतर ठाकरे गटाने ऐतिहासिक देखावा साकारण्याचा निर्णय घेतला.गणेशोत्सवात विसर्जन मिरवणूक मार्गावर उभारण्यात येणाऱ्या उंच व भव्य स्वागतकमानी हे मिरजेतील गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. मिरवणूक मार्गावर उभारण्यात येणाऱ्या कमानींवर देखावे साकारण्यात येतात. गतवर्षी शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाने मार्केट परिसरात उभारण्यात येणाऱ्या स्वागतकमानीवर दावा केल्याने दोन्ही गटांत वाद झाला. प्रशासनाने मध्यस्थी करून ठाकरे गटाला कमान व त्यासमोर शिंदे गटाला स्वागतकक्ष उभारण्यास परवानगी देऊन हा वाद मिटविला होता. यावर्षी पुन्हा शिंदे गटाचे शहरप्रमुख किरणसिंग रजपूत यांनी शिवसेनेच्या स्वागतकमानीवर दावा केल्याने ठाकरे गटाने विरोध केला.

शिवसेना कोणाची या वादाबाबत निवडणुक आयोगाने निर्णय दिल्याने स्वागतकमान आमचीच असा शिंदे गटाचा दावा होता. शिवसेनेचे नाव व चिन्ह शिंदे गटाला मिळाले असल्याने पक्षाच्या स्वागत कमानीसाठी शिंदे गटाने आग्रह धरल्याने ठाकरे गटानेही कमान आमचीच असा पावित्रा घेतला. या वादामुळे दोन्ही गटांना नेहमीच्या जागेवर कमान उभारण्याची परवानगी न देण्याचा पोलिसांनी निर्णय घेतला. कमान कोणाची या वादावर तोडगा काढण्यासाठी पोलिसांनी दोन्ही गटांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. मार्केटमधील नेहमीच्या जागी परवानगी न देता लक्ष्मी मार्केट इमारतीसमोर शिंदे गटाला व किल्ला रस्त्यावर ठाकरे गटाला स्वागतकमानीस परवानगी देण्यात आली. दोन्ही गटांनी हा तोडगा मान्य केल्याने वाद संपुष्टात आल्याचे पोलिसांनी सांगितले.लक्ष्मी मार्केटसमोर नवीन कमानीमुळे तेथे असणाऱ्या कमानी व स्वागतकक्षांना अडचण होणार आहे. यामुळे महापालिका व पोलिसांचा स्वागतकक्ष श्रीकांत चाैकात हलविण्यात येणार आहे.

वादग्रस्त देखाव्यास प्रतिबंधठाकरे गटाने स्वागतकमानीवर ४० गद्दारांचे व्यंगचित्र साकारण्याची तयारी केली होती. याविरोधात शिंदे गटानेही आक्रमक पावित्रा घेतला. वादग्रस्त देखाव्यास परवानगी मिळणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केल्यानंतर ठाकरे गटाचे शहरप्रमुख चंद्रकांत मैगुरे यांनी घूमजाव केले. आता ठाकरे गटाच्या कमानीवर सुरतेची लूट व शिंदे गटाच्या कमानीवर शिवराज्याभिषेक साकारण्यात येणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे