शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना नेते शेखर माने राष्ट्रवादीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 15:15 IST

NCP Sangli- शिवसेनेचे नेते, माजी नगरसेवक शेखर माने यांनी गुरुवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश कार्यक्रम पार पडला. या प्रवेशामुळे शिवसेनेला सांगलीत धक्का बसला आहे. ​​​​​​​

ठळक मुद्देशिवसेना नेते शेखर माने राष्ट्रवादीतमुंबईत कार्यक्रम : शिवसेनेला सांगलीत मोठा धक्का

सांगली : शिवसेनेचे नेते, माजी नगरसेवक शेखर माने यांनी गुरुवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश कार्यक्रम पार पडला. या प्रवेशामुळे शिवसेनेला सांगलीत धक्का बसला आहे.माने यांनी यापूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादीत दिवंगत नेते मदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम केले होते. महापालिकेत दोनवेळा ते नगरसेवक होते. सांगलीतील उपमहापौरगटाचे नेते म्हणून त्यांनी काम केले. या काळात पक्षाविना त्यांनी दबावगट स्थापन करुन महापालिकेच्या राजकारणात दबदबा निर्माण केला होता.

महापालिकेच्या स्थापनेपासून सांगलीच्या राजकारणात, समाजकारणात माने यांनी स्वतंत्र छााप पाडली. महापूर, कोरोना काळात त्यांनी नागरिकांना मदत केली होती. शहरातील नागरिक, व्यापाऱ्यांच्या विविध प्रश्नावर त्यांनी आंदोलनेही केली आहेत. सध्या व्यापारी संघटनेचे नेतृत्वही त्यांच्याकडे आहेत.गेल्या तीन वर्षापासून ते शिवसेनेचे नेते म्हणून कार्यरत होते. सांगली शहरातील अनेक युवा मंडळाचे नेतृत्व ते करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादीत जाण्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्यासोबत शहरातील अनेक मंडळाचे युवक व शिवसेनेतील मोठा गटही आता राष्ट्रवादीशी जोडला जाणार आहे.जयंत पाटील यांच्याकडून कौतुकजयंत पाटील यांनी प्रवेशावेळी माने यांच्या महापौर, उपमहापौर निवडीतील योगदानाचे कौतुक केले. माने यांच्यासारख्या समाजकारण्यांमुळे पक्षसंघटन अधिक मजबुत होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. शेखर माने म्हणाले की, शहराच्या विकासासाठी आजवर आम्ही राबलो. आताही पक्षप्रवेशामागे शहर विकासाचा उद्देश आहे. शिवसेनेतही कोणत्याही पदाविना मी कार्यरत राहिलो. तिथेही अपेक्षा केली नाही. राष्ट्रवादीतही शहरासाठी आवश्यक असलेली कामे व्हावीत, हीच अपेक्षा घेऊन आलो आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाSangliसांगलीJayant Patilजयंत पाटील