शिवसेनेतर्फे गाडगेबाबा जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:29 IST2021-02-24T04:29:45+5:302021-02-24T04:29:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शिवसेनेच्या वतीने येथील गणेश मार्केटमधील कार्यालयात संत गाडगे महाराजांची जयंती साजरी करण्यात आली आहे. ...

Shiv Sena celebrates Gadge Baba Jayanti | शिवसेनेतर्फे गाडगेबाबा जयंती साजरी

शिवसेनेतर्फे गाडगेबाबा जयंती साजरी

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शिवसेनेच्या वतीने येथील गणेश मार्केटमधील कार्यालयात संत गाडगे महाराजांची जयंती साजरी करण्यात आली आहे.

हिंदू एकता आंदोलन चे संस्थापक अध्यक्ष नारायणराव कदम, बीपीन कदम यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नारायण कदम म्हणाले की, संत गाडगेबाबा यांनी समाजामध्ये स्वच्छतेचा मोठा संदेश दिला असून, आताच्या युगात रोगराई पसरली असल्याने गाडगेबाबांची कृती समाजासाठी लाभदायी ठरेल. तत्कालीन ग्रामविकासमंत्री आर. आर. पाटील यांनीसुद्धा संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविले होते. ते संपूर्ण महाराष्ट्रभर गाजले होते. यावेळी उपस्थित रावसाहेब घेवारे, पंडितराव बोराडे, प्रसाद रीसवडे, लक्ष्‍मण वडर, जितेंद्र शहा, दिलीप शेलार आदी उपस्थित होते

Web Title: Shiv Sena celebrates Gadge Baba Jayanti