शिवसेनेच्या जिल्ह्यातील पदाधिकारी निवडी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:19 IST2021-06-20T04:19:06+5:302021-06-20T04:19:06+5:30
इस्लामपूर : सांगली जिल्ह्यातील शिवसेनेच्या नव्या पदाधिकारी निवडीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. यानुसार विविध संघटनात्मक पदावरील ...

शिवसेनेच्या जिल्ह्यातील पदाधिकारी निवडी जाहीर
इस्लामपूर : सांगली जिल्ह्यातील शिवसेनेच्या नव्या पदाधिकारी निवडीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. यानुसार विविध संघटनात्मक पदावरील निवड यादी जाहीर करण्यात आली. अविनाश पाटील हे उपजिल्हा प्रमुख, तर सागर मलगुंडे यांची वाळवा तालुका प्रमुखपदी निवड झाली.
मुंबई येथे पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. जिल्ह्यातील शिवसेनेचे संघटन आणि नवीन पदाधिकारी निवडीविषयी चर्चा केली. यावेळी उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, अनिल देसाई, उपनेते नितीन बानुगडे-पाटील, जिल्हा प्रमुख संजय विभूते उपस्थित होते.
उपजिल्हा संघटक साहेबराव पाटील, सूरज पाटील, डॉ. सुधीर मैदानकर, प्रदीप करगणीकर, युवराज निकम, जितेंद्र सव्वाशे, विधानसभा क्षेत्रप्रमुख नानासाहेब शिंदे, तालुकाप्रमुख प्रदीप माने (तासगाव), संजय सावंत (जत), अंकुश होवाळे (जत पूर्व), विशालसिंह रजपूत (मिरज पश्चिम), संजय काटे (मिरज पूर्व) यांच्या निवडी झाल्या आहेत.
तालुका संघटक- वीर कुदळे, ॲड. सागर घोलप, शिवाजी पवार, अमित दुधाळ, अनिल पाटील, जयवंत माळी, रमेश नाईक, शहरप्रमुख- विजय शिंदे, चंद्रकांत मैगुरे, संजय चव्हाण, विशाल शिंदे, आप्पासाहेब चव्हाण, शहर संघटक- सुरेश साखळकर, सूरज कासलीकर, अण्णासाहेब कुरळपकर, प्रदीप कांबळे, किरण रजपूत, अभिजित दळवी, सतीश पाटील, अक्षय होनकळसे.
फोटो-
मुंबई येथील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आनंदराव पवार, मंत्री उदय सामंत, नितीन बानुगडे-पाटील उपस्थित होते.