शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या रानात उभे राहून शिवसैनिक करणार नुकसानीचे पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 17:53 IST

farmar, rain, shivsena, sanglinews, गेल्या तीन दिवसात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सर्व शेतकऱ्यांना मदतीचे दिलासादायक आश्वासन दिले असून आता गावोगावच्या शिवसैनिकांनी आपापल्या परिसरातील शेतकऱ्यांचे पंचनामे रानात उभे राहून पूर्ण करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी केले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या रानात उभे राहून शिवसैनिक करणार नुकसानीचे पंचनामे संजय विभूते यांची माहिती : जिल्हाभर अभियान सुरु

सांगली : गेल्या तीन दिवसात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सर्व शेतकऱ्यांना मदतीचे दिलासादायक आश्वासन दिले असून आता गावोगावच्या शिवसैनिकांनी आपापल्या परिसरातील शेतकऱ्यांचे पंचनामे रानात उभे राहून पूर्ण करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी केले आहे.पत्रकात विभूते यांनी म्हटले आहे की, राज्यातील शेतकऱ्यांना चिंतामुक्त करणारे उध्दव ठाकरे यांच्यासारखे प्रामाणिक नेतृत्व मुख्यमंत्रीपदी विराजमान आहे. यापूर्वीही त्यांनी शेतकऱ्यांना पिकविम्या द्वारे मदत मिळावी म्हणून तत्कालीन भाजप सरकारवर आणि कंपन्यांवर दबाव वाढवून शेतकऱ्यांचे हित साधले होते. ती कृती महाराष्ट्र विसरलेला नाही.

मुख्यमंत्र्यांनी आताही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन साथ देईल असे जाहीर केले आहे. मात्र लोकांचे नुकसान किती झाले याचा खरा अंदाज येण्यासाठी पंचनामे ही आवश्यक बाब आहे. यंत्रणा याकामी आपली जबाबदारी पार पाडत असली तरी शिवसेना हा सत्ताधारी पक्ष आहे आणि त्या पक्षाचा गावचा घटक म्हणून प्रत्येक शिवसैनिकांनी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. ८० टक्के समाजकारण हे शिवसेनेचे ब्रीद आहे. आपण त्याला जागून आपली जबाबदारी पार पाडीत राहूया.

सांगली जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले. त्यांचा आधार बनून त्यांचा भाऊ म्हणून शिवसैनिकांनी आपली जबाबदारी पार पाडावी तसेच आपल्या गावातील किती लोकांचे पंचनामे झाले, किती राहिले, किती दिवसात पूर्ण होणार याची माहिती आपल्याकडे ठेवावी.

यासाठी सहकार्य केले नाही अशा शासकीय कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत योग्य समज देण्याचे काम आपण करू. मात्र एकही शेतकऱ्याचा पंचनामा झाला नाही असे होऊ नये यासाठी सर्व शिवसैनिकांनी जागृकपणे कार्य करावे तसेच कोणाचा पंचनामा राहीला तरी काळजी न करता स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन संजय विभूते व आनंदराव पवार यांनी केले आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीSangliसांगली