शिरटे : गेल्या २५ ते ३० वर्षांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:27 IST2021-01-20T04:27:00+5:302021-01-20T04:27:00+5:30
शिरटे : गेल्या २५ ते ३० वर्षांत सुटले नाहीत ते धरणग्रस्तांचे प्रश्न येत्या काही दिवसांतच मार्गी लागण्याची व्यवस्था करण्यात ...

शिरटे : गेल्या २५ ते ३० वर्षांत
शिरटे : गेल्या २५ ते ३० वर्षांत सुटले नाहीत ते धरणग्रस्तांचे प्रश्न येत्या काही दिवसांतच मार्गी लागण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सरकारकडून ८० टक्के व लोकवर्गणीतून २० टक्के रक्कम उभारुन क्षारपडीमुळे हातातून गेलेली शेतजमीन पुन्हा पिकाऊ व्हावी यासाठीचा धोरणात्मक निर्णय येत्या काही दिवसातच घेतला जाईल, अशी ग्वाही जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास मंत्री जयंत पाटील यांनी दिली.
येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे गोरक्षनाथ मंदिर पोखर्णी तलाव येथे भक्तनिवास इमारत व विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राजारामबापू बँकेचे अध्यक्ष शामराव पाटील अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रवादीचे सरचिटणीस बाळासाहेब पाटील, राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील, तालुकाध्यक्ष विजय पाटील, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष संजय पाटील, युवकअध्यक्ष संग्रामसिंह पाटील, महिला अध्यक्षा सुश्मिता जाधव, नीताताई पाटील, अलकाताई माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री पाटील म्हणाले, वाळवा तालुक्यातील प्रत्येक शाळेतून विद्यार्थ्यांना जातीचे दाखले देण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच जातपडताळीसुध्दा शाळेतूनच होण्यासाठी पाठपुरावा केला आहे. सरकारची तिजोरी मोकळी असली तरी येणाऱ्या अर्थसंकल्पात रितसर कर्ज भरणाऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यासाठी तरतूद केली जाणार आहे. पोखर्णीच्या तलावाचे संवर्धन, बांधकाम व रस्ते यासाठीच्या निधीची तरतूद लवकरच केली जाईल.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, माजी सभापती सचिन हुलवान यांनी मनोगत व्यक्त केले. उपसरपंच संदीप दबडे यांनी स्वागत केले. राजारामबापू बँकेचे संचालक ॲड. संग्राम पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. विकास पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संजय पाटील यांनी आभार मानले.
यावेळी प्रकाश पाटील, अजित पाटील, दिलीपराव शेरेकर, हणमंतराव पाटील, सुरेश पाटील, शंभोराजे पवार आदी उपस्थित होते.
चौकट
कुठे गेले सरपंच...
येडेमच्छिंद्र येथे जयंत पाटील यांच्याहस्ते विविध विकासकामांचे उदघाटन करण्यात आले. यावेळी सरपंच गणेश हराळे यांची उपस्थिती होती. व्यासपीठावरील कार्यक्रमाकडे मात्र त्यांनी पाठ फिरविली. ही गोष्ट लक्षात येताच ‘उद्घाटनाला होते, मग कुठे गेले सरपंच.’ अशी टिप्पणी जयंत पाटील यांनी केली. यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला.
फोटो : १९ शिरटे १
अेाळ : येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे मंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते गोरक्षनाथ मंदिर भक्तनिवासचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अजित पाटील, दिलीप शेरेकर, सचिन हुलवान, संजय पाटील उपस्थित होते.