शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाचा भोंगा!, सांगलीतील 'या' गावाने विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सुरु केला विशेष उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 16:30 IST

सहदेव खोत पुनवत : शिराळा तालुक्यात माॅडेल स्कूलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शैक्षणिक चळवळ निर्माण झाली आहे. त्या अनुषंगाने आपल्या ...

सहदेव खोतपुनवत : शिराळा तालुक्यात माॅडेल स्कूलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शैक्षणिक चळवळ निर्माण झाली आहे. त्या अनुषंगाने आपल्या गावातील प्रगत शैक्षणिक गुणवत्तेत सातत्य राहावे आणि भविष्यात गावातील शैक्षणिक संपत्ती अधिक समृद्धी व्हावी, यासाठी १२ सप्टेंबरपासून शिराळे खुर्द, ता. शिराळा गावात ‘शिक्षणाचा भोंगा’ (डिजिटल डिटाॅक्स) उपक्रम ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद शाळा यांच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.शिराळे खुर्द येथे नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत जि. प. शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश सावंत यांनी ‘शिक्षणाचा भोंगा’ (डिजिटल डिटॉक्स) बाबत ठराव मांडला आणि याबाबत सविस्तर माहिती दिली. पालक आणि ग्रामस्थ यांनी आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. गावात सायंकाळी ६ ते ८ या वेळेत टीव्ही व मोबाइलचा वापर बंद करून विद्यार्थी अभ्यासाला बसतील, असे नियोजन केले आहे. त्यासाठी ग्रामपंचायत सदस्य आणि शाळा व्यवस्थापन समिती यांचेमार्फत प्रबोधन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी हा उपक्रम पूरक ठरणार आहे. सध्या आधुनिक युगात मोठ्या प्रमाणात टीव्ही व मोबाइलचा वापर होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर दुष्परिणाम होत आहे. म्हणूनच गावाने विद्यार्थ्यांना अभ्यासाची सवयी लागावी यासाठी ‘अभ्यासाचा भोंगा प्रकल्प’ गावात राबविला जात असून याचा आदर्श जिल्ह्यातील इतर गावे घेतील, असा विश्वासही सरपंच शर्मिला आंदळकर यांनी व्यक्त केला.यावेळी माजी सरपंच दत्तात्रय आंदळकर, जे. के. पाटील, लक्ष्मण पाटील, गणेश पाटील, पल्लवी पाटील, मुख्याध्यापक प्रकाश सावंत, शिक्षक सतीश मोरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मारुती पाटील, अरुण पाटील, महादेव गुरव, गणपती गुरव, श्रीरंग पाटील, संदीप कांबळे, अनिकेत मोरे आदी उपस्थित होते.

मुलांना अभ्यासाची गोडी लागली पाहिजे, या उद्देशाने शिक्षणाचा भोंगा हा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमास तरुणासह पालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मोबाइल, टीव्हीच्या आहारी गेलेल्या मुलांना अभ्यासाची सवय लागावी, हाच हेतू आहे. -शर्मिला आंदळकर, सरपंच, शिराळे खुर्द, ता. शिराळा.

टॅग्स :SangliसांगलीStudentविद्यार्थी