शिराळे खुर्द ग्रामस्थांनी श्रमदानातून बनवला रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:17 IST2021-06-30T04:17:20+5:302021-06-30T04:17:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुनवत : शिराळे खुर्द ता. शिराळा येथील ग्रामस्थांनी वाडी, जांभळाईदेवी मंदिराकडे जाणारा रस्ता श्रमदानातून पूर्ण करून ...

Shirale Khurd villagers built the road through hard work | शिराळे खुर्द ग्रामस्थांनी श्रमदानातून बनवला रस्ता

शिराळे खुर्द ग्रामस्थांनी श्रमदानातून बनवला रस्ता

लोकमत न्यूज नेटवर्क

पुनवत : शिराळे खुर्द ता. शिराळा येथील ग्रामस्थांनी वाडी, जांभळाईदेवी मंदिराकडे जाणारा रस्ता श्रमदानातून पूर्ण करून समाज कार्याचा आदर्श सर्वांसमोर उभा केला आहे.

शिराळे खुर्द येथून पूर्वेस जाणारा रस्ता गावची वाडी, जांभळाईदेवी मंदिराकडे जातो. या रस्त्याला वारणा डावा कालवा लागतो. कालव्याच्या परिसरात या रस्त्याची दुरवस्था झाली होती. येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास होत होता. शिवाय वाहनांनाही कसरत करावी लागत होती.

रस्त्याची समस्या लक्षात घेऊन सरपंच किरण पाटील, उपसरपंच लक्ष्मण सुर्ले, भुजंग मोरे, भीमराव कदम, विवेक खिलारे, सुनील पाटील, प्रदीप पाटील, विलास पाटील, आनंदा जनवाडकर, पांडुरंग पाटील, तुकाराम पाटील, रामचंद्र पाटील, बाळकृष्ण पाटील, नारायण पाटील, लक्ष्मण मोरे आदी ग्रामस्थांनी श्रमदानातून रस्त्याची स्वच्छता करून भराव टाकला.

सध्या रस्त्याची डागडुजी झाल्याने सर्व ग्रामस्थांची सोय झाली आहे.

चौकट

सामाजिक बांधिलकी

रस्त्याच्या कामासाठी सरपंच किरण पाटील, भुजंग मोरे, भीमराव कदम यांनी पुढाकार घेऊन आर्थिक तरतूद तसेच कामासाठी लागणाऱ्या वाहनांची सोय केली .इतर ग्रामस्थांनी त्यांना साथ देऊन सामाजिक बांधिलकी जपली.

Web Title: Shirale Khurd villagers built the road through hard work