शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

शिराळा विधानसभेची दहीहंडी शिवाजीराव नाईकच फोडणार: सत्यजित नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2018 11:57 PM

शिराळा : शिराळा विधानसभा मतदारसंघात चारशे कोटींवर झालेली विकासकामे पाहता, २०१९ च्या विधानसभेची दहीहंडी आमदार शिवाजीराव नाईकच फोडणार, असा विश्वास यशवंत युवक संघटनेचे अध्यक्ष सत्यजित नाईक यांनी व्यक्त केला.मानखुर्द (मुंबई) येथे संघर्ष प्रतिष्ठान व शिवसह्याद्री ग्रुप यांच्यातर्फे आयोजित दहीहंडी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. भारतीय कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष ...

शिराळा : शिराळा विधानसभा मतदारसंघात चारशे कोटींवर झालेली विकासकामे पाहता, २०१९ च्या विधानसभेची दहीहंडी आमदार शिवाजीराव नाईकच फोडणार, असा विश्वास यशवंत युवक संघटनेचे अध्यक्ष सत्यजित नाईक यांनी व्यक्त केला.मानखुर्द (मुंबई) येथे संघर्ष प्रतिष्ठान व शिवसह्याद्री ग्रुप यांच्यातर्फे आयोजित दहीहंडी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. भारतीय कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष डी. आर. जाधव अध्यक्षस्थानी होते.यावेळी सत्यजित नाईक म्हणाले, शिराळा पश्चिम भागात रस्ते, वीज, आरोग्य यासह इतर मूलभूत सुविधांसाठी, त्याचबरोबर भाजप सरकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून शिवाजीराव नाईक यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी तालुक्यात आणला आहे. यामुळे २०१९ ची दहीहंडी आमदार शिवाजीराव नाईकच फोडणार, हे निश्चित आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील बहुतांशी मतदार मुंबईला आहेत. त्यांना आजवर अनेक सोयी-सुविधा शासनाच्या विविध योजनांतून पुरविल्या आहेत. या दोन्ही मंडळांच्या माध्यमातून युवकांची संघटित ताकद सामाजिक कार्यासाठी उभी करून लोकांचे प्रश्न सोडवावेत.यावेळी डी. आर. जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. दहीहंडी विजेत्या संघास मान्यवरांच्याहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमास सचिन नाचणकर, दीपक गुरव, जालिंदर गलुगडे, राजेंद्र नेर्लेकर यांच्यासह मानखुर्दमधील युवक व मुंबईस्थित नागरिक उपस्थित होते.