महिला सहाय्यक आयुक्तांवरील हल्ल्याचा शिराळ्यात निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:57 IST2021-09-02T04:57:11+5:302021-09-02T04:57:11+5:30
शिराळा : शिराळा नगरपंचायतीमार्फत ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे व त्यांच्या अंगरक्षकावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा अधिकारी व ...

महिला सहाय्यक आयुक्तांवरील हल्ल्याचा शिराळ्यात निषेध
शिराळा : शिराळा नगरपंचायतीमार्फत ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे व त्यांच्या अंगरक्षकावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा अधिकारी व कर्मचारी संघटनेच्यावतीने एक दिवस दैनंदिन कामकाज बंद ठेवून निषेध करण्यात आला. याबाबत नायब तहसीलदार सचिन कोकाटे, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार, मुख्याधिकारी योगेश पाटील यांना निवेदन देण्यात आले.
माजीवाडा प्रभाग येथे अतिक्रमणविरोधी पथक घेऊन अनधिकृत हातगाड्यावर कारवाई करत असताना गुन्हेगारी प्रवृत्तीचा फेरीवाला अरजीत यादव याने त्यांच्यावर व अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला केला. या प्रकाराचा निषेध करून गुन्हेगारास शिक्षा करावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी कार्यालयीन अधीक्षक सुविधा पाटील, अविनाश जाधव, नयना कुंभार, अर्चना गायकवाड, संजय इंगवले, प्रकाश शिंदे, आबाजी दिवाण, विजय शिंदे, सदानंद टिळे, संजय इंगवले, लक्ष्मण मलमे, तात्यासाहेब कांबळे, प्रिती पाटील, काजोल शिंदे आदी उपस्थित होते.