शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

video-शिराळा नगरपंचायतीने साकारला नेत्रदीपक तिरंगा, सांगली जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 17:12 IST

सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांच्या घोषणांच्या गजरात जगजागृती रॅली

श्रीनिवास नागेशिराळा (सांगली) : शिराळा नगरपंचायतीने ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमांतर्गत आज, शनिवारी १०० फूट लांब व ६७ फूट रुंद राष्ट्रध्वज फडकवण्याचा सांगली जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम राबविला. या उपक्रमामध्ये शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते.प्रारंभी न्यू इंग्लिश स्कुल, कन्या शाळा, श्री शिवछत्रपती विद्यालय, विश्वासराव नाईक व बाबा नाईक महाविद्यालय, भारतीय विद्यानिकेतन, यशवंत बालक मंदिर, सदगुरु प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा, उर्दू शाळा, जिल्हा परिषद शाळा, तसेच शहरातील सर्व शासकीय कार्यालयांच्या सहभागाने शहरातील प्रमुख मार्गावरुन ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाबाबत जनजागृती करण्यात आली. सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांच्या घोषणांच्या गजरात जगजागृती रॅलीची सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरुन रॅलीचा समारोप श्री शिवछत्रपती विद्यालय मैदानात करण्यात आला. यावेळी तहसीलदार गणेश शिंदे यांनी घरोघरी तिरंगा अभियानाबाबत माहिती दिली.कार्यक्रमाचा प्रमुख भाग असलेला व प्रमुख आकर्षण ठरलेला १०० फूट लांब व ६७ फूट रुंद तिरंगा ध्वज विद्यार्थ्यांच्या शिरावरून रिमझिम पावसात डौलात फडकविण्यात आला. या फडकलेल्या राष्ट्रध्वजाला उपस्थित सर्वांनीच राष्ट्रगीत गावून मानवंदना दिली.मुख्याधिकारी योगेश पाटील, गटविकास अधिकारी संतोष राऊत, पोलिस निरीक्षक सुरेश चिल्लावार, सहाय्यक निरीक्षक ज्ञानदेव वाघ, गटशिक्षण अधिकारी प्रदीप कुडाळकर, सुविधा पाटील, अर्चना गायकवाड, संजय इंगवले, लक्ष्मण मलमे, सुभाष इंगवले, सदानंद टिळे, विजय शिंदे, काजोल शिंदे, प्रीती पाटील उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीStudentविद्यार्थीIndependence Dayस्वातंत्र्य दिन