शिराळा - कोकरूड रस्ता धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:26 IST2021-02-10T04:26:21+5:302021-02-10T04:26:21+5:30
शिराळा : महामार्गावरील शिराळा - कोकरूड रस्ता काम अपघातास निमंत्रण ठरत आहे. या मार्गावरील जुन्या छोट्या पुलावरच नवीन पुलाचे ...

शिराळा - कोकरूड रस्ता धोकादायक
शिराळा
: महामार्गावरील शिराळा - कोकरूड रस्ता काम अपघातास निमंत्रण ठरत आहे. या मार्गावरील जुन्या छोट्या पुलावरच नवीन पुलाचे कठडे बांधले जात आहेत.
विटा - रत्नागिरी रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. यातील विटा, पेठ, मलकापूर, अणुस्कुरा या १५० किलोमीटर रस्त्याचे काम एकाच ठेकेदाराकडे आहे. हे १९०.३७ कोटी रुपयांचे काम आहे. ठेकेदाराने ठराविक अंतराचे काम पूर्ण करून पुढील कामास सुरुवात केली असती तर काही प्रमाणात लक्ष देणे शक्य झाले असते. मात्र, विविध तालुक्यात थोडेथोडे काम सुरू आहे. ठेकेदाराकडून निकृष्ट काम होत असल्याची तक्रार होत आहे. मुरूम तसेच खडीचा भराव निकृष्ट आहे. नवीन झालेल्या रस्त्याचे काम आत्ताच काही ठिकाणी निघू लागले आहे, तर काही ठिकाणी खचू लागले आहे. काही छोटे पूल नव्याने न करता फक्त वरील दगडी बांधकाम काढून काँक्रीटचे कठडे बांधण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्याखालील पाईप अथवा बांधकाम जुनेच असल्याने ते किती दिवस टिकणार, असा सवाल आहे. काही पूल रस्त्याच्या मार्गाच्या दिशेने न बांधता तिरके आहेत. असे पूल अपघातास निमंत्रण ठरत आहेत.
फोटो - १) व २) जुन्याच सिडी वर्कवर नवीन काँक्रीट टाकून रंगकाम
३) रस्ते जोडताना कोणतीही खबरदारी घेतली नाही. त्यामुळे दोन रस्त्याच्या उंचीत फूटभर अंतर आहे.