शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

Sangli News: शिराळा येथील वनक्षेत्रपाल सचिन जाधव निलंबित, कामात वरिष्ठांची फसवणूक केल्याचा ठपका

By श्रीनिवास नागे | Updated: February 28, 2023 13:37 IST

निलंबन काळात जाधव यांना सांगली येथील उप वनसंरक्षक कार्यालयाच्या मुख्यालयात हजर राहण्याच्या सूचना

युनूस शेखइस्लामपूर : वाळवा तालुक्यातील पोखर्णी येथे पुनर्वसन करण्यात आलेल्या झोळंबी वसाहतीमधील जमीन सपाटीकरण कामात मनमानी करताना वरिष्ठ अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत शिराळा येथील वनक्षेत्रपाल सचिन शंकर जाधव यांना निलंबित करण्यात आल्याचे आदेश सांगलीच्या उप वनसंरक्षक नीता कट्टे यांनी दिले आहेत.शिराळा येथे वनक्षेत्रपाल म्हणून कार्यरत असणाऱ्या सचिन जाधव यांनी मौजे पोखर्णी (झोळंबी वसाहत ) ता. वाळवा येथील जमीन सपाटीकरणासाठीच्या कामांना उप कार्यकारी अभियंता, वारणा कालवे विभाग क्र. १ इस्लामपूर या कार्यालयाकडून तांत्रिक मान्यता न घेता परस्पर खोटे सही शिक्के वापरून व त्यावर सहया करून सदरची अंदाजपत्रके वरिष्ठ कार्यालयास मंजूरीसाठी सादर केल्याची तक्रार संभाजी ब्रिगेडचे राज्य सहसंघटक सुयोग औधकर यांनी केली होती.या तक्रारीची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी केल्यावर वारणा कालवे विभागाच्या कार्यालयाकडून अशा कामाला कोणतीही मंजुरी देण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले.त्यामुळे वन क्षेत्रपाल जाधव यांनी या कामात वरिष्ठ अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपिल नियम १९७९ अंतर्गत शिस्तभंगाची कार्यवाही करत निलंबनाची कारवाई झाली आहे. निलंबन काळात जाधव यांना सांगली येथील उप वनसंरक्षक कार्यालयाच्या मुख्यालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीforest departmentवनविभाग