शिक्षक बँक कायम ठेव परत करणार : बाजीराव सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:26 IST2021-03-31T04:26:23+5:302021-03-31T04:26:23+5:30
अंकलखोप (ता. पलूस) येथील म्हसोबा देवालय परिसरात पलूस तालुक्यातील शिक्षक समिती कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी सावंत म्हणाले, रिझर्व्ह बँकेने ...

शिक्षक बँक कायम ठेव परत करणार : बाजीराव सावंत
अंकलखोप (ता. पलूस) येथील म्हसोबा देवालय परिसरात पलूस तालुक्यातील शिक्षक समिती कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी सावंत म्हणाले, रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना लाभांश वाटप करण्यास मनाई केली आहे. हे विरोधी पार्लमेंटरी बोर्ड अध्यक्षांना माहीत असूनसुद्धा सभासदांची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करीत आहेत. सभासदांच्या हितासाठी पोटनियम दुरुस्ती केल्याबद्दल पार्लमेंटरी बोर्ड व संचालक मंडळाचे अभिनंदन करीत आहाेत. ज्यांनी बँकेची स्वतः थकबाकी ठेवली आपल्या बगलबच्च्यांनाही थकबाकी ठेवायला लावली, त्यांनी बँकेविषयी व सभासदांविषयी कळवळा दाखवू नये. सभासद आपणास निवडणुकीत जागा दाखवतील यात शंका नाही.
यावेळी विष्णू रोकडे, सर्जेराव लाड बाबासाहेब लाड, प्रदीप मोकाशी, राजेंद्र कांबळे, शंकर टकले, हिंमत गोरड, सतीश नलवडे, धोंडीराम पिसे, रोहित गुरव, उत्तम कदम, अमोल साळुंखे, नागनाथ सुतार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. संदीप कांबळे यांनी आभार मानले.