शेवगा, पालेभाज्यांची आवक वाढली; मिरचीचे दर वाढल्याने ग्राहकांना ठसका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:22 IST2021-02-08T04:22:47+5:302021-02-08T04:22:47+5:30
सांगली : थंडीचा कडाका एकीकडे वाढत चालला असताना, त्यामुळे बाजारपेठेतील आवकेवरही परिणाम जाणवत आहे. त्यानुसार या आठवड्यात शेवग्याची चांगली ...

शेवगा, पालेभाज्यांची आवक वाढली; मिरचीचे दर वाढल्याने ग्राहकांना ठसका
सांगली : थंडीचा कडाका एकीकडे वाढत चालला असताना, त्यामुळे बाजारपेठेतील आवकेवरही परिणाम जाणवत आहे. त्यानुसार या आठवड्यात शेवग्याची चांगली आवक झाली आहे. मेथी, शेपूसह पालेभाज्याही वाजवी दरात मिळत आहेत. मात्र, लाल मिरचीच्या दरात पंधरवड्यात वाढ झाल्याने ग्राहकांना ठसका लागला आहे.
भाजीपाला दर आवाक्यात असलेतरी काहींच्या दरात वाढ झाली आहे. त्यानुसार वरणा, दोडका, गवारीच्या दरात काहीशी वाढ झाली आहे, तर वांगी, बटाट्याचे दर स्थिर आहेत.
किराणा मालाचे दर स्थिर असले तरी अद्यापही खाद्यतेल, कडधान्यांची दरवाढ कायम आहे. तिखटासाठीच्या लाल मिरच्यांना मागणी असल्याने दरात २० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ब्याडगी, शंकेश्वरी मिरचीच्या दरात वाढ झाली आहे.
चौकट
किराणा दरवाढ कायम
पंधरवड्यापासून किराणा मालाच्या दरात होत असलेली वाढ अद्यापही कायम आहे. त्यामुळे खरेदीवर परिणाम झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
चौकट
कलिंगडाची मोठी आवक
उन्हाळ्याची चाहूल लागली नसताना कलिंगडाची चांगली आवक होत आहे. परिणामी सरासरी १० रुपयांनी दरात घट झाली आहे.
चौकट
शेवगा तोऱ्यात
या आठवड्यात शेवग्याची सर्वाधिक आवक झाली आहे. सध्या बहर तेजीत असल्याने पुढील दोन महिने शेवग्याची आवक असणार आहे. यासह काकडी, भोपळाही वाजवी दरात मिळत आहे.
कोट
थंडीमध्ये भाजीपाल्याचे दर कमी होतात असा अंदाज होता; मात्र, त्यातील वाढ अद्यापही कायम आहे. तेल आणि इतर सामानाचे दर कमी करून दिलासा द्यावा.
शुभांगी गुरव, गृहिणी
कोट
या आठवड्यात गोटा खोबरे, मसाल्याचे जिन्नसांच्या दरात वाढ झाली आहे. सरकी, सूर्यफूल तेलाचे वाढलेले दर अद्यापही कायम आहेत. दर कमी होण्याची शक्यता नाही.
महेश यादव, व्यापारी
कोट
सफरचंद, संत्री, कलिंगड, ड्रॅगन फ्रुटला ग्राहकांची मागणी आहे. यावेळी परिपक्व स्ट्रॉबेरीही लवकरच बाजारात आली आहे.
सचिन गर्जे, विक्रेता.