गदिमा स्मारकासाठी शेटफळेकरांचे खासदारांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:32 IST2021-08-17T04:32:41+5:302021-08-17T04:32:41+5:30
करगणी : शेटफळे (ता. आटपाडी) येथे खासदार संजयकाका पाटील यांनी भेट दिली. यावेळी गावातील समस्यांसंदर्भात चर्चा केली. यावेळी शेटफळेकरांनी ...

गदिमा स्मारकासाठी शेटफळेकरांचे खासदारांना साकडे
करगणी : शेटफळे (ता. आटपाडी) येथे खासदार संजयकाका पाटील यांनी भेट दिली. यावेळी गावातील समस्यांसंदर्भात चर्चा केली. यावेळी शेटफळेकरांनी आधुनिक वाल्मीकी गदिमांचे अपूर्ण स्मारक पूर्ण करण्याची मागणी केली. यावेळी माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, शेटफळेचे माजी सरपंच पांडुरंग गायकवाड, सांगली जिल्हा होलार समाजाचे नेते दत्तात्रय कांबळे. पी. एस. गायकवाड. पांडुरंग गायकवाड यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी दत्तात्रय कांबळे यांनी संजयकाका पाटील यांच्याकडे नाझरे मठ येथून जाणारा राष्ट्रीय महामार्ग ते चिंध्यापिर-शेटफळे मार्गे करगणीला जोडणाऱ्या भिवघाट-कराड या राज्य महामार्गाला जोडणारा रस्ता मंजूर करण्याची मागणी केली. यावेळी संजयकाका पाटील यांनी शेटफळेच्या विकासाला चालना देण्यासाठी दळणवळण सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. गदिमा स्मारकाभोवती संरक्षक भिंत व ओढा पात्रामध्ये घाट यासाठी निधी देण्याची ग्वाही दिली.