आष्टा उपनगराध्यक्षपदी शेरनवाब देवळे यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:33 IST2021-07-07T04:33:23+5:302021-07-07T04:33:23+5:30
फोटो -०६०७२०२१-आयएसएलएम-धैर्यशील थोरात लोकमत न्यूज नेटवर्क आष्टा : आष्टा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी शेरनवाब शमशुद्दीन देवळे यांची तर धैर्यशील विलासराव ...

आष्टा उपनगराध्यक्षपदी शेरनवाब देवळे यांची निवड
फोटो -०६०७२०२१-आयएसएलएम-धैर्यशील थोरात
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : आष्टा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी शेरनवाब शमशुद्दीन देवळे यांची तर धैर्यशील विलासराव थोरात यांची स्वीकृत नगरसेवकपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नगराध्यक्ष स्नेहा माळी यांनी काम पाहिले. या निवडी ऑनलाइन करण्यात आल्या.
आष्टा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष प्रतिभा पेटारे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागी आष्टा शहर विकास आघाडीने शेरनवाब देवळे या शिंदे गटाच्या ज्येष्ठ नगरसेवकांना पहिल्यांदा संधी दिली, तर जलसंपदा मंत्री जयंत पाटील गटाचे स्वीकृत नगरसेवक विकास बोरकर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर धैर्यशील विलासराव थोरात यांना संधी देण्यात आली. निवडीनंतर जल्लोष करण्यात आला.
निवडीनंतर राजारामबापू कारखान्याचे संचालक विराज शिंदे, माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील, राजारामबापू दूध संघाचे संचालक संग्राम फडतरे, धैर्यशील शिंदे, पी. एल. घस्ते, अर्जुन माने, शकील मुजावर, रामचंद्र अवघडे, प्रभाकर जाधव, अॅड. अभीराजे थोरात, महेश गुरव, वैभव सांभारे, अनिल बोंडे, बाबासाहेब सिद्ध, सतीश माळी, जगन्नाथ बसुगडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
शेरनवाब देवळे म्हणाले की, दिवंगत माजी आमदार विलासराव शिंदे यांनी शहराचा सर्वांगीण विकास केला. सत्ताधारी गटाने संधी दिल्याने सर्वांना बरोबर घेऊन या काळात शहरातील विकास कामांना गती देणार आहे.
धैर्यशील थोरात म्हणाले की, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी विश्वास दाखवला तो सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करणार आहे. यावेळी सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.