शिक्षक संघाचे शेगावला अधिवेशन
By Admin | Updated: November 1, 2015 00:01 IST2015-10-31T23:44:37+5:302015-11-01T00:01:35+5:30
शिवाजीराव पाटील : शताब्दी कार्यक्रमाला नरेंद्र मोदींना बोलाविणार

शिक्षक संघाचे शेगावला अधिवेशन
सांगली : प्राथमिक शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवण्यास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ कटिबद्ध आहे. राज्य शिक्षक संघाचे अधिवेशन शेगाव येथे घेतले जाणार आहे. शिक्षक संघाचा शताब्दी महोत्सव कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येतील. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती शिक्षक नेते माजी आमदार शिवाजीराव पाटील यांनी कोयनानगर येथे शिक्षक संघ महामंडळ सभेत दिली.
पाटील म्हणाले, संघाच्या माध्यमातून शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवले जातील.
राज्यअध्यक्ष बाळासाहेब काळे म्हणाले, प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सर्व संघटनांनी एकत्र लढा देणे गरजेचे आहे. माधवराव पाटील म्हणाले, शिक्षक संघाला शंभर वर्षांचा गौरवशाली इतिहास आहे. तरुण शिक्षकांनी व्यापक योगदान द्यावे. दरम्यान, एनपीआर, जनगणना प्रगणक संदर्भातील याचिकेबाबत सरचिटणीस मधुकर काठोळे यांनी माहिती दिली. सभेला जिल्हाध्यक्ष मुकूंद सूर्यवंशी, दयानंद मोरे, अमोल माने, सूर्यकांत पाटील, हंबीरराव पवार उपस्थित होते. (प्रतिनिधी)