नेर्लेत विजेच्या धक्क्याने मेंढीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:26 IST2021-05-19T04:26:43+5:302021-05-19T04:26:43+5:30
नेर्ले : नेर्ले, ता. वाळवा येथे विजेची तार पडून धक्का बसल्याने एका मेंढीचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने मनुष्यहानी व ...

नेर्लेत विजेच्या धक्क्याने मेंढीचा मृत्यू
नेर्ले : नेर्ले, ता. वाळवा येथे विजेची तार पडून धक्का बसल्याने एका मेंढीचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने मनुष्यहानी व अन्य मेंढ्यांचा जीव वाचला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गेले दोन दिवस नेर्ले येथे वादळी पाऊस चालू होता. या पावसात राष्ट्रीय महामार्गावरून सतीश शामराव वीरकर हे आपल्या मेंढ्यांना घेऊन गावात येत होते. ग्रामपंचायत कार्यालयानजीक आल्यानंतर पाठीमागे असलेल्या मेंढीच्या अंगावर विजेची तार तुटून पडली. वीज प्रवाह चालू असल्याने मेंढी जाग्यावरच तडफडून मरण पावली. हे लक्षात येताच मेंढपाळाने अन्य मेंढ्यांना पुढे हाकून बाजूला उभे राहिले. वीज वितरण कंपनीला कळविल्यानंतर वीज प्रवाह खंडित करण्यात आला. वीरकर यांचे २० हजार रुपयांचे नुकसान झाले असून, याबाबत तलाठी पंडित चव्हाण यांनी पंचनामा केला आहे. मेंढपाळ असणाऱ्या वीरकर यांना विनाविलंब नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते माजी सरपंच लालासाहेब पाटील यांनी केली आहे.