‘ती’ रेमडेसिविर इंजेक्शन शासकीय रुग्णालयातीलच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:20 IST2021-05-28T04:20:59+5:302021-05-28T04:20:59+5:30

सांगली : रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळाबाजारप्रकरणी मिरज शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यास अटक करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू असून, ...

‘She’ Remadesivir injection is from a government hospital | ‘ती’ रेमडेसिविर इंजेक्शन शासकीय रुग्णालयातीलच

‘ती’ रेमडेसिविर इंजेक्शन शासकीय रुग्णालयातीलच

सांगली : रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळाबाजारप्रकरणी मिरज शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यास अटक करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू असून, आता रुग्णालय प्रशासनाने ‘ती’ दोन रेमडेसिविर इंजेक्शन शासकीय रुग्णालयातीलच असल्याचे पत्र पोलिसांना दिले आहे. यापूर्वीच्या अहवालावेळी इंजेक्शन रुग्णालयातील नसल्याचे पत्र देण्यात आले होते.

मिरज शासकीय रुग्णालयातील कर्मचारी सुमीत हुपरीकर व त्याचा मित्र दाविद वाघमारे यांना रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करताना पोलिसांनी पकडले होते. त्यानंतर विश्रामबाग पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

यापूर्वी रुग्णालयाने दिलेल्या माहितीत काळाबाजार झालेले इंजेक्शन रुग्णालयातील नसल्याचे पोलिसांना सांगितले हाेते. त्यानंतर पोलिसांकडून नव्याने या प्रकरणाचा तपास सुरू असून, आता रुग्णालय प्रशासनाने सादर केलेल्या पत्रात ते इंजेक्शन रुग्णालयातीलच असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पोलीस तपासाला आता पुन्हा गती मिळणार आहे.

Web Title: ‘She’ Remadesivir injection is from a government hospital