राजारामबापू दूध संघाच्या उपाध्यक्षपदी शशिकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:22 IST2020-12-09T04:22:50+5:302020-12-09T04:22:50+5:30
इस्लामपूूर : येथील राजारामबापू पाटील सहकारी दूध संघाच्या उपाध्यक्षपदी शशिकांत शंकर पाटील (रा. ठाणापुडे) यांची निवड करण्यात आली. जगन्नाथ ...

राजारामबापू दूध संघाच्या उपाध्यक्षपदी शशिकांत पाटील
इस्लामपूूर : येथील राजारामबापू पाटील सहकारी दूध संघाच्या उपाध्यक्षपदी शशिकांत शंकर पाटील (रा. ठाणापुडे) यांची निवड करण्यात आली. जगन्नाथ पाटील यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर ही निवड केली.
संचालक मंडळाच्या विशेष बैठकीत ही प्रक्रिया पार पडली. अध्यक्ष विनायकराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. सहायक निबंधक अरुण चौगुले यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या सूचनेवरून शशिकांत पाटील यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यानुसार संचालक उदय पाटील यांनी सूचना मांडली, तर विलासराव पाटील यांनी अनुमोदन दिले.
निवडीनंतर पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राजारामबापू बॅँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष संजय पाटील, संघाचे संचालक नेताजीराव पाटील, बाळासाहेब पाटील, रमेश पाटील, संग्राम फडतरे, भगवानराव सावंत, विकास कांबळे, अल्लाउद्दीन चौगुले, अनिल खरात, उज्ज्वला पाटील उपस्थित होते.
फोटो ०८१२२०२०-आयएसएलएम- दूध संघ न्यूज
इस्लामपूर येथे राजारामबापू दूध संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शशिकांत पाटील यांचा सत्कार अरुण चौगुले यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी प्रा. शामराव पाटील, विनायकराव पाटील, विजयराव पाटील उपस्थित होते.