इस्लामपुरात शरद पवार यांचा वाढदिवस उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:40 IST2020-12-13T04:40:16+5:302020-12-13T04:40:16+5:30

इस्लामपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, राष्ट्रीय नेते खासदार शरद पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माजी मंत्री अण्णासाहेब ...

Sharad Pawar's birthday in Islampur | इस्लामपुरात शरद पवार यांचा वाढदिवस उत्साहात

इस्लामपुरात शरद पवार यांचा वाढदिवस उत्साहात

इस्लामपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, राष्ट्रीय नेते खासदार शरद पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, युवा नेते प्रतीक पाटील यांच्याहस्ते केक कापण्यात आला. कोविडच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यात राबविण्यात आलेल्या‘व्हर्च्युअल रॅली’त दीड लाख कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले. ही रॅली तीन तास चालली.

येथील राजारामबापू नाट्यगृहात वाळवा तालुक्यतील राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हा सोहळा तब्बल दोन तास चालला होता. यावेळी आपल्या राष्ट्रीय नेत्याच्या सुखद आठवणीत आणि त्यांच्या कर्तबगारीवर प्रत्येक कार्यकर्ता अचंबित झाला होता. राज्य बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील, पी. आर. पाटील, प्रा. शामराव पाटील, विनायक पाटील, नेताजीराव पाटील, अल्लाउद्दीन चौगुले, सुरेश गावडे, रवींद्र बर्डे, बाळासाहेब पाटील, छाया पाटील, विजयराव पाटील, संजय पाटील, संग्राम पाटील, सुस्मिता जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

सुनीता देशमाने, कमल पाटील, कामगार नेते शंकरराव भोसले, आष्टयाचे माजी नगराध्यक्ष झुंझारराव पाटील, दिलीपराव वग्यानी, विराज शिंदे, इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष ॲड. चिमण डांगे, सुभाषराव सूर्यवंशी, शहराध्यक्ष शहाजी पाटील, खंडेराव जाधव, अरुण कांबळे, रोझा किणीकर या व्हर्चुअल रॅलीत सहभागी झाले होते.

फोटो-१२इस्लामपुर०१

फोटो ओळी- इस्लामपूर येथे राष्ट्रीय नेते खा. शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस केक कापून साजरा करताना माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, प्रतीकदादा पाटील, माणिकराव पाटील, दिलीपराव पाटील, पी. आर. पाटील, प्रा. शामराव पाटील, विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील, संजय पाटील उपस्थित होते.

Web Title: Sharad Pawar's birthday in Islampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.