शहरं
Join us  
Trending Stories
1
शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?
2
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
3
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
4
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची संपत्ती किती? रिव्हॉल्व्हर, बंदूक, 12 किलो चांदी...
5
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
6
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
7
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
8
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
9
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
10
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
11
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
12
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
13
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
14
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
15
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
16
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
17
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
18
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
19
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
20
May Born Astro: मे महिन्यात जन्मलेले लोक म्हणजे चेहऱ्याने लोभस, डोक्याने तापट आणि लहरी स्वभावाचे मिश्रण!

शरद पवार, उद्धव ठाकरे अर्जुनाप्रमाणे गोंधळलेले : संभाजीराव भिडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2020 2:07 PM

राम मंदिराच्या भूमिपूजनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी केलेले वक्तव्य योग्य नसून ते पाप आहे. महाभारतात आपल्याच नातेवाईकांविरुद्ध लढताना अर्जून जसा गोंधळला होता तशी या दोन्ही नेत्यांची अवस्था झाली आहे, अशी टीका शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्देराम मंदिराचा भूमिपूजन सोहळा दिवाळीसारखा साजरा करा: संभाजीराव भिडेकोरोनाला घाबरून जाण्याचे कारण नाही

सांगली : राम मंदिराच्या भूमिपूजनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी केलेले वक्तव्य योग्य नसून ते पाप आहे. महाभारतात आपल्याच नातेवाईकांविरुद्ध लढताना अर्जून जसा गोंधळला होता तशी या दोन्ही नेत्यांची अवस्था झाली आहे, अशी टीका शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.ते म्हणाले की, उद्धव ठाकरेशरद पवार दोन्ही नेते वंदनीय आहेत. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या वतीने राम मंदिराच्या भूमिपूजनास उपस्थित रहावे. उद्धव ठाकरे यांनी आॅनलाईन पद्धतीने सोहळा करण्याची केलेली मागणी बाळासाहेब ठाकरे यांना अजिबात आवडली नसती.

शिवसेना ही हिंदू धर्मरक्षणासाठी आवश्यक आहे. शिवसेनेचे यातील योगदान महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी जायला हवे. राज्यभरातही दौरा करून ठाकरे यांनी कोरोनाबद्दलची लोकांमधील भीती दूर करावी.कोरोनाला घाबरून जाण्याचे कारण नाही. सूरक्षित अंतराचा नियम तसेच लॉकडाऊनसारखे प्रकार खच्चीकरण करणारे आहेत. त्यामुळे राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा दिवाळीसारखा एक राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा करावा.

देशातील सर्व हिंदू बांधवांनी दारासमोर सडा टाकून रांगोळी काढावी आणि फटाक्यांची आतषबाजी करावी. जवळपास ५00 वर्षानंतर याठिकाणी मंदिर उभे रहात असल्याने हा हिंदू धर्मियांसाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे. जाती-पाती व राजकीय भेदभाव टाळून सर्वांनी या क्षणाला एकत्र यावे.राम मंदिराचे पुजारी गोविंदगिरी महाराज यांच्याशी मी संपर्क साधला होता. भूमिपूजनावेळी ज्या छत्रपती शिवरायांनी हिंदू धर्माच्या रक्षणाचे अत्यंत मोलाचे कार्य केले त्यांची प्रतिमाही पुजावी, अशी मागणी केली आहे. हिंदू धर्मियांनीही रामाबरोबर छत्रपती शिवरायांची पूजा त्यादिवशी घरांमध्ये करावी. राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी शिवरायांच्या ३२ किल्ल्यांवरील माती व सरोवराचे पाणी आम्ही पाठवत आहोत.पुतळ्यास मिशा असाव्यातराम-लक्ष्मण हे पुरुष होते. आजपर्यंत त्यांच्या कोणत्याही प्रतिमांमध्ये त्यांना मिशा दाखविल्या गेल्या नाहीत. त्यामुळे राम मंदिरातील मूर्ती तयार करताना त्यांना मिशा असाव्यात, अशी मागणी आम्ही गोविंदगिरी महाराजांकडे केल्याचे भिडे यांनी सांगितले.संसदेत आक्षेप घेणाऱ्यांनी राजीनामा द्यावासंसदेत उदयनराजे यांनी ‘जय शिवाजी, जय भवानी’ असे म्हटल्यानंतर ज्यांनी त्यावर आक्षेप घेतला त्यांनी तातडीने राजीनामा देऊन त्यांच्या गावाकडे परतावे, अशी मागणी भिडे यांनी यावेळी केली.

टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेSangliसांगलीRam Mandirराम मंदिर