शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
2
Rishabh Pant Has Been Ruled Out : रिषभ पंतची न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार; कारण...
3
'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर
4
WPL 2026 : हरमनप्रीतच्या MI चा विजयी कल्ला! DC ची कॅप्टन जेमिमावर आली स्मृतीसारखी वेळ
5
"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले?
6
शिंदेसेनेला मतदान करा, जैन व्यापाऱ्याच्या मुलाची पोस्ट; भाजपा उमेदवाराच्या पत्नीने दिली धमकी
7
'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची बोचरी टीका
8
बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी?
9
राम मंदिराजवळ नमाज पढणारा अब्दुल अहद शेख कोण? बॅगेत सापडलं असं काही, कुटुंबीय म्हणाले...  
10
PCMC Election 2026: निवडणुका जवळ आल्या की, अनेकांचा कंठ फुटून काहीही बोलतात, दादा आपण रागवायचं नाही - देवेंद्र फडणवीस
11
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईहून पालघरला आले, पोहायला पाण्यात उतरले आणि एकावर मृत्युने घातली झडप
12
ठाकरे बंधूंच्या 'शिवगर्जनेची' तारीख ठरली! शिवाजी पार्कवर राज ठाकरे कोणता गौप्यस्फोट करणार?
13
शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार नाहीत?; प्रफुल पटेल यांच्या विधानानं नव्या चर्चांना उधाण
14
WPL 2026 : अनुष्का शर्माचा ‘पायगुण’! GG ची ‘साडेसाती’ संपली; UP वॉरियर्सकडून ‘ती’ एकटीच लढली
15
मोदी सरकारविरोधात लिखाण करणाऱ्या डॉ. संग्राम पाटील यांना मुंबईत येताच पोलिसांनी घेतलं ताब्यात
16
Holiday for Election: मतदानासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर, कोणाला लागू असणार?
17
"आमचा जीव घेतला तरीही..."; सुप्रिया सुळे कडाडल्या; भाजपाला इशारा, मुंबईबाबत काय म्हणाल्या?
18
चौफेर टीका, भाजपाची नाचक्की, अखेरीस स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने दिला राजीनामा
19
Video - ओडिशामध्ये ९ सीटर चार्टर्ड प्लेन क्रॅश; पायलटसह ६ जण गंभीर जखमी
20
ICC U19 World Cup Warm up Matches : वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी! शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Politics: जयंत पाटील यांना धक्का, आमदार अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड करणार भाजपमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 12:30 IST

जयंत पाटील यांच्या पलूस तालुक्यातील राजकीय वर्चस्वाला धक्का बसण्याची शक्यता

पलूस / कुंडल : पलूस तालुक्यात आमदार जयंत पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. जयंत पाटील यांचे निष्ठावान आमदार अरुण लाड यांचे पुत्र क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ७ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगण्यात आले.आमदार अरुण लाड यांचे कुटुंब हे जयंत पाटील यांचे निकटवर्ती व विश्वासू म्हणून ओळखले जाते. पुणे पदवीधर मतदारसंघातून अरुण लाड यांना जयंत पाटील यांनी ताकद पणाला लावून निवडून आणले होते. मात्र, आता अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड भाजपला साथ देणार असल्याने जयंत पाटील यांच्या पलूस तालुक्यातील राजकीय वर्चस्वाला धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.भाजपने याआधीच देशमुख बंधूंच्या माध्यमातून तालुक्यात स्थान घट्ट केले होते. त्यात आता शरद लाड यांचा प्रवेश झाल्यानंतर भाजपची ताकद याठिकाणी वाढण्याची चिन्हे आहेत. भाजप व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील संघर्ष जगजाहीर आहे. त्यात भर म्हणजे गोपीचंद पडळकर विरुद्ध जयंत पाटील असा जिल्ह्यात टोकाचा संघर्ष आधीच पेटलेला आहे.आता यात भरीस भर म्हणून लाड कुटुंबीयातील नव्या पिढीतील नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश होत असल्याने ही उलथापालथ जयंत पाटील यांच्या राजकीय अस्तित्वासाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. यामुळे पलूस तालुक्यातील सत्तेची समीकरणे बदलणार आहेत.अरुण लाड हे अजूनही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातच आहेत. ते पक्ष सोडण्याची शक्यता नाही. त्यामुळे एकाच कुटुंबात दोन प्रतिस्पर्धी पक्ष नांदण्याची चिन्हे आहेत.

भाजपकडून हिरवा कंदिललवकरच पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागणार आहे. यासाठी शरद लाड हे इच्छुक आहेत. यासाठी भाजप पक्ष नेतृत्वाकडून उमेदवारीबाबत लाड यांना हिरवा कंदील मिळाल्याने लाड भाजपमध्ये गेल्याची चर्चा आहे.

कार्यकर्त्यांची दोन दिवसांत बैठक घेणार आहे. त्यांना विश्वासात घेऊनच आम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. पक्षाबरोबर जिल्हाभरातील कार्यकर्तेही आम्हाला महत्त्वाचे आहेत. - शरद लाड, अध्यक्ष, क्रांती साखर कारखाना, कुंडल

English
हिंदी सारांश
Web Title : Setback for Jayant Patil: Arun Lad's Son to Join BJP

Web Summary : Sharad Lad, son of NCP MLA Arun Lad, will join BJP, dealing a blow to Jayant Patil's influence in Sangli. While Arun Lad remains with NCP, his son's move creates a political split within the family.