शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

शांतिनिकेतनचा कर्मयोगी पुरस्कार रयत शिक्षण संस्थेला जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 9:37 PM

प्राचार्य डॉ.पी.बी.पाटील सोशल फोरम, शांतिनिकेतन सांगलीच्यावतीने देण्यात येणारा ‘कर्मयोगी’ पुरस्कार यंदा ‘रयत शिक्षण संस्थे’ला प्रदान करण्यात येणार आहे.

सांगली : प्राचार्य डॉ.पी.बी.पाटील सोशल फोरम, शांतिनिकेतन सांगलीच्यावतीने देण्यात येणारा ‘कर्मयोगी’ पुरस्कार यंदा ‘रयत शिक्षण संस्थे’ला प्रदान करण्यात येणार आहे. रविवार १४ जानेवारी रोजी शांतिनिकेतन लोकविद्यापीठात मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार आहे. यावेळी संस्थेच्या बिसूर हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक तानाजी पाटील व कलाविश्व महाविद्यालयाचे सेवानिवृत्त वरीष्ठ लिपीक शामराव जगताप यांना ‘माई’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ही माहिती फोरमचे सचिव बी. आर. थोरात यांनी पत्रकार बैठकीत दिली.ते म्हणाले की, समाजाच्या विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाºया त्याचप्रभाणे या क्षेत्रात नवनवे प्रयोग करुन समाजाला नवी दिशा देणाºया, समाजातील गोरगरीब, कष्टकरी बहुजन समाज स्वावलंबी आणि स्वाभिमानी व्हावा यासाठी कार्यरत राहिलेल्या ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ.पी.बी.पाटील यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी फोरम कार्यरत आहे. त्याचाच एक भाग म्हणून निरपेक्षपणे कार्य करणाºया संस्थेस, कार्यकर्त्यास  प्रतिवर्षी ‘कर्मयोगी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा हा पुरस्कार रयत शिक्षण संस्थेला जाहिर करण्यात आला आहे. संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल आप्पासाहेब पाटील हे सन्मान स्वीकारणार आहेत. या कार्यक्रमास माजी अ‍ॅडिशनल डायरेक्टर जनरल आॅफ पोलिस, महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे सदस्य भगवानराव मोरे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तर अध्यक्षस्थानी फोरमचे अध्यक्ष ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार आहेत, कर्मवीरअण्णांची रयत शिक्षण संस्था आज शतक महोत्सव साजरा करीत आहे. डॉ. अनिल पाटील यांनी चेअरमन पदाची सुत्रे घेतल्यानंतर ही संस्था ग्लोबल व्हायला सुरवात झाली. शिक्षणाबाबत नवी नजर आणि ध्येय असलेले डॉ. पाटील यांनी रयतचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन कर्मयोगी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. कर्मवीरअण्णांचा वारसा जपत ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ.पी. बी. पाटील यांनीही शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे.  ही व्यवस्था कारकून तयार करणारी नसून माणसाला माणून घडविणारी आहे, हा विचार कर्मवीरअण्णांचा होता. तोच विचार घेऊन डॉ. पी. बी. पाटील व त्यांच्यानंतर संचालक गौतम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनची वाटचाल सुरू असल्याचेही थोरात यांनी सांगितले.