शंकरराव शिंदे सोसायटी शेतकऱ्यांना आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:27 IST2021-04-01T04:27:26+5:302021-04-01T04:27:26+5:30
आष्टा : शंकरराव शिंदे उत्तर भाग सेवा सहकारी सोसायटीने आष्टा सहकार पंढरीतील शेतकऱ्यांना आर्थिक आधार देऊन त्यांचे जीवनमान उंचावले ...

शंकरराव शिंदे सोसायटी शेतकऱ्यांना आधार
आष्टा : शंकरराव शिंदे उत्तर भाग सेवा सहकारी सोसायटीने आष्टा सहकार पंढरीतील शेतकऱ्यांना आर्थिक आधार देऊन त्यांचे जीवनमान उंचावले आहे. धान्य विभाग, कृषी विभाग व सेव्हिंग्ज विभागाच्या माध्यमातून यशस्वी घोडदौड सुरू ठेवली आहे, असे प्रतिपादन राजारामबापू कारखान्याचे संचालक विराज शिंदे यांनी केले.
आष्टा येथील शंकरराव शिंदे उत्तर भाग सोसायटीच्या वार्षिक सभेत ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील, उपाध्यक्ष घनश्याम पाटील, दिलीप शिंदे, बाळासाहेब आटुगडे, सर्जेराव तांबवेकर, जयसिंग भोसले, बाळासाहेब शिंदे, वसंत माळी व सचिव हरिबा खिलारे प्रमुख उपस्थित होते.
राहुल पाटील म्हणाले, ‘संस्थेच्या ठेवी ६५ लाख, कर्ज ६ कोटी २५ लाख, भाग भांडवल ९६ लाख १० हजार, निधी ५९ लाख ८३ हजार, वसुली १०० टक्के, नफा १० लाख ८८ हजार आहे. सभासदांना ९ टक्के लाभांश वाटप केले आहे. सचिव हरी खिलारे यांनी अहवाल वाचन केले. जगन्नाथ बसुगडे यांनी आभार मानले. यावेळी कोरोनाचे नियम पाळून सर्व संचालक व सभासद उपस्थित होते.
फोटो : ३१ आष्टा १
ओळ : शंकरराव शिंदे उत्तर भाग सोसायटीच्या वार्षिक सभेत राजारामबापू कारखान्याचे संचालक विराज शिंदे, राहुल पाटील, घनश्याम पाटील, दिलीप शिंदे, हरिबा खिलारे, सर्जेराव तांबवेकर, जगन्नाथ बसुगडे उपस्थित हाेते.