राज्य साखर कामगार मंडळाच्या सरचिटणीसपदी शंकरराव भोसले
By Admin | Updated: May 26, 2014 01:18 IST2014-05-26T00:34:37+5:302014-05-26T01:18:37+5:30
श्रीरामपूरचे अविनाश आपटे कार्याध्यक्षपद

राज्य साखर कामगार मंडळाच्या सरचिटणीसपदी शंकरराव भोसले
इस्लामपूर : महाराष्टÑ राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या सरचिटणीसपदी (जनरल सेक्रेटरी) राजारामबापू साखर कारखान्याच्या कामगार युनियनचे मार्गदर्शक कामगार नेते शंकरराव भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली़ प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष बी़ आऱ पाटील यांनी पुणे येथील एस़ एम. जोशी सभागृहात भोसले यांच्यासह श्रीरामपूरचे अविनाश आपटे यांची कार्याध्यक्षपदी निवड जाहीर केली. कार्याध्यक्ष किशोरकाका पवार व जनरल सेक्रेटरी आऱ बी़ शिंदे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पुणे येथील प्रतिनिधी मंडळाच्या कार्यकारिणी सभेत राज्यातील पदाधिकार्यांच्या उपस्थितीत या निवडी जाहीर करण्यात आल्या़ भोसले व आपटे या विद्यमान उपाध्यक्षांच्या रिक्त पदावर नवीन पदाधिकारी निवडण्याचे अधिकार बी़ आऱ तात्यांना देण्यात आले़ या सभेत मंडळाच्या कार्याचा आढावा मांडल्यानंतर विविध विषयांवर चर्चा करून सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले़ आऱ बी़ शिंदे यांच्या निधनानंतर पहिलीच सभा असल्याने सर्वच वक्त्यांना आप्पांच्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव करताना कंठ दाटून आला. प्रारंभी फलटण शुगर फॅक्टरीचे अध्यक्ष व कामगार युनियनचे अध्यक्ष प्रल्हाद साळुंखे-पाटील यांच्याहस्ते शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. धोरण समितीचे सचिव शिवाजीराव काळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले़ राज्य चिटणीस राऊ पाटील यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. याप्रसंगी इंदापूरचे युवराज रणवरे यांच्यासह अनेक नेत्यांनी साखर कामगारांची ताकद दाखविण्यासाठी मुंबई येथे महामोर्चा काढण्याची मागणी केली़ श्रीकांत देसाई (सांगली), उदयकाका नाईक (शिराळा), नितीन बेनकर (अकलूज), सुरेश मोहिते (अकलूज), रावसाहेब भोसले (दत्त, शिरोळ), शिवाजी पाटील (वारणा), शिवाजी कापूरकर, अशोक मोरे, व्ही़ टी़ पाटील (कºहाड), तसेच वाळवा तालुका राष्ट्रीय साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे जनरल सेक्रेटरी मोहनराव शिंदे, उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, विकास पवार, शामराव पवार, संजय शेळके, सर्जेराव निंबाळकर, हौसेराव पाटील, एन. जी. पाटील, विश्वास पाटसुते, रामभाऊ पाटील, सदाशिव पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)