मिरज सुधार समितीच्या अध्यक्षपदी शंकर परदेशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:19 IST2021-05-31T04:19:47+5:302021-05-31T04:19:47+5:30

मिरज : मिरजेतील शहर सुधार समितीच्या अध्यक्षपदी शंकरलाल भरतलाल परदेशी यांची निवड करण्यात आली. अध्यक्ष जावेद पटेल यांचे निधन ...

Shankar Pardeshi as the Chairman of Miraj Improvement Committee | मिरज सुधार समितीच्या अध्यक्षपदी शंकर परदेशी

मिरज सुधार समितीच्या अध्यक्षपदी शंकर परदेशी

मिरज : मिरजेतील शहर सुधार समितीच्या अध्यक्षपदी शंकरलाल भरतलाल परदेशी यांची निवड करण्यात आली. अध्यक्ष जावेद पटेल यांचे निधन झाल्याने परदेशी यांची निवड करण्यात आली. विवेक शेटे व विलास देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संस्थापक ॲड. ए. ए. काझी, मुस्तफा बुजरूक, संतोष माने यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली.

छत्रपती शिवाजी रस्त्यासह शहरातील मूलभूत सुविधा समस्या व प्रलंबित प्रश्नांसाठी समितीच्या माध्यमातून पाठपुरावा करणार असल्याचे नूतन अध्यक्ष शंकर परदेशी यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, गीतांजली पाटील, सुनीता कोकाटे, रूपाली गाडवे, महेंद्र गाडे, अनिल देशपांडे, शकील पीरजादे,आसिफ निपाणीकर, शाहिद सतारमेकर, नयुम नदाफ, अक्षय वाघमारे, झोहेब मुल्ला, सुहास कापसे, सचिन गाडवे, बबलू आलासे, श्रीकांत महाजन, जावेद शरीकमसलत, विजय धुमाळ, गुरुराज परदेशी आदी सदस्य उपस्थित होते. जहीर मुजावर यांनी आभार मानले.

Web Title: Shankar Pardeshi as the Chairman of Miraj Improvement Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.